शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

युजर्सच्या इमेजेस बनवूनच ‘घामाघूम’, ‘घिबली’मुळे चॅटजीपीटी दीड तास बंद, आता दिवसाला केवळ एवढेच फोटो तयार करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 06:55 IST

Ghibli Images: सध्या सोशल मीडियात ‘घिबली’ एमेजेसचा धुमाकूळ सुरू आहे. कोट्यवधी युजर्सनी या इमेजेसचा धडाका लावल्याने ही छायाचित्रे  तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल चॅटजीपीटी रविवारी जगभरात बंद पडले होते.

कॅलिफोर्निया - सध्या सोशल मीडियात ‘घिबली’ एमेजेसचा धुमाकूळ सुरू आहे. कोट्यवधी युजर्सनी या इमेजेसचा धडाका लावल्याने ही छायाचित्रे  तयार करून देणारे ओपन एआयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल चॅटजीपीटी रविवारी जगभरात बंद पडले होते. भारतातही सायंकाळी दीड तास बंद होते. त्यामुळे अखेर कंपनीने इमेजेस बनविण्यावर निर्बंध घातले आहेत. आता फ्री व्हर्जन युजर्सना एका दिवसात केवळ ३ इमेजेस तयार करता येतील.

या काळात डाउनडिटेक्टरमध्ये आउटेजच्या अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या. ओपन एआयने सर्व्हिसेस रीस्टोर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. सर्व सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर कंपनीने पाच दिवसात यामागच्या कारणांचा अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले आहे.  (वृत्तसंस्था)  

नेमके काय झाले? युजर्समध्ये सध्या जीपीटी-४ओची नवीन अपडेट स्टुडिओ गिबलीची प्रचंड लोकप्रियता वाढली आहे. यात युजर्सना आपले ॲनिमेटेड फोटो तयार करून मिळतात. असे फोटो तयार करून युजर्सनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करणे सुरू केले. कोट्यवधी युजर्सनी यात एकाचवेळी सहभाग घेतल्याने चॅटजीपीटीवर अचानक ताण वाढला. त्यामुळे पुढे आऊटेज झाले. 

आता ब्रेक घ्या, टीमला झोप हवीफीचरची मागणी वाढल्याने ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी एक्सवर वर पोस्ट केले, कृपया इमेज तयार करण्यामध्ये ब्रेक घ्या, टीमला झोपेची गरज आहे. इमेज जनरेटरमुळे सर्व्हरवर प्रचंड दबाव पडत आहे. आमचे जीपीयू  वितळत आहेत. इमेज जनरेटरवर तात्पुरती मर्यादा लावत आहोत. सर्व्हरची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.  

हा जीवनाचा अपमान; संस्थापकांची टीकाघिबली आर्टचे जनक स्टुडिओ घिबलीचे संस्थापक हयाओ मियाजाकी यांनी एआयच्या जनरेटेड इमेजेसवर टीका केल्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. त्यात हयायो यांनी म्हटले आहे की, मी कधीही माझ्या कलेत हे तंत्रज्ञान स्वीकारणार नाही. हा जीवनाचा अपमान आहे. माणूस अनुभव, वेदना, आनंद चित्रे व कहाण्यांमध्ये उतरवत असतो. परंतु, एआय ॲनिमेशन यापासून कोसो दूर आहे. एआय जनरेटेड इमेजवर त्यांनी ही टीका २०२६ मध्ये केलेली आहे.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सInternationalआंतरराष्ट्रीयtechnologyतंत्रज्ञान