शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकदरम्यान रिओमध्ये फ्रेंच पथकावर हल्ल्याची शक्यता

By admin | Updated: July 15, 2016 12:23 IST

रिओ आॅलिम्पिकदरम्यान ब्राझीलमधील इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांकडून फ्रान्स पथकातील खेळाडूंवर मोठा हल्ला करण्याची योजना तयार होत असल्याचे वृत्त आहे.

पॅरिस : रिओ आॅलिम्पिकदरम्यान ब्राझीलमधील इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांकडून फ्रान्स पथकातील खेळाडूंवर मोठा हल्ला करण्याची योजना तयार होत असल्याचे वृत्त आहे. फ्रान्सच्या गुप्तहेर एजन्सीच्या अहवालात हा दावा करण्यात आला.फ्रान्सच्या सैन्यदलाच्या गुप्तहेर संचालनालयाचे (डीआरएम) महासचिव ख्रिस्टोफे गोमार्ट यांनी संसदीय आयोगापुढे वर्षभरातील दहशतवादी हल्ल्याची सुनावणी करतेवेळी ही माहिती दिली. गोमार्ट यांचे वक्तव्य सार्वजनिक करण्यात आले आहे.गोमार्ट यांनी खासदारांना सांगितले की, आपल्याला गुप्तहेर सूत्रांकडून ही माहिती मिळाली. रिओत जाणाऱ्या फ्रान्सच्या खेळाडू पथकावर ब्राझीलमधील इस्लामी मूलतत्त्ववादी जबर हल्ल्याची योजना आखत आहेत. या बाबतची सविस्तर माहिती मात्र गोमार्ट यांनी उघड केली नाही. नोव्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या हल्ल्याचा तपास डीआरएम करीत आहे. या घटनेत १४७ जणांचा मृत्यू झाला होता. एजन्सीने अहवालाचा एक भाग याच आठवड्यात सार्वजनिक केला. फ्रान्सच्या प्रशासनाने देखील या दाव्याची अधिक माहिती दिलेली नाही. दुसरीकडे ब्राझीलच्या सुरक्षाविषयक कॅबिनेटने फ्रेंच प्रशासनाच्या या दाव्याची माहिती आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. ब्राझील प्रशासनाने आम्ही फ्रान्सला कुठलीही माहिती पुरविलेली नाही, असेही स्पष्ट केले आहे. ब्राझीलचे कायदामंत्री अलेक्झांड्रोव्ह मॉरिस यांनी काही दिवसांआधी आॅलिम्पिकदरम्यान रिओत जिहादी हल्ला होण्याची शंका व्यक्त केली होती हे विशेष. ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत आयोजित आॅलिम्पिकसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेत ८५ हजार सुरक्षा रक्षक, ४७ हजार पोलीस आणि ३८ हजार सैनिकांचा समावेश असेल. या सुरक्षा यंत्रणेवर १० हजार ५०० खेळाडू, मोठ्या संख्येने येणारे अधिकारी आणि पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी असेल.(वृत्तसंस्था)