शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताचा देशातून स्वतंत्र होण्याचा लढा स्पेन सक्तीने चिरडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:31 IST

कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताचा देशातून स्वतंत्र होण्यासाठी सुरू असलेला लढा सक्तीने चिरडून टाकण्याचा निर्धार पंतप्रधान मरिआनो रजॉय यांच्या नेतृत्वाखालील स्पेनच्या संघीय सरकारने शनिवारी जाहीर केला.

माद्रिद : कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताचा देशातून स्वतंत्र होण्यासाठी सुरू असलेला लढा सक्तीने चिरडून टाकण्याचा निर्धार पंतप्रधान मरिआनो रजॉय यांच्या नेतृत्वाखालील स्पेनच्या संघीय सरकारने शनिवारी जाहीर केला.मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीनंतर पंतप्रधान रेजॉय यांनी सांगितले की, कॅटलोनियाची स्वातंत्र्याची मागणी पूर्णपणे घटनाबाह्य असल्याने तिचा बीमोड करण्यासाठी राज्यघटनेतील विशेष तरतुदींचा वापर करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार कॅटलोनियाच्या प्रांतिक कायदेमंडळाच्या अधिकारांवर मर्यादा आणल्या जातील, तेथील सरकार बरखास्त करून केंद्रीय राजवट लागू केली जाईल व येत्या सहा महिन्यांत तेथे प्रांतिक कायदेमंडळासाठी नव्याने निवडणुका घेतल्या जातील. अर्थात येत्या २७ आॅक्टोबर रोजी भरणाºया अधिवेशनात स्पेनच्या संसदेने यास मंजुरी दिली तरच पंतप्रधान हे खास अधिकार वापरू शकतील.केंद्र सरकारचा विरोध डावलून दोन आठवड्यांपूर्वी कॅटलोनियात स्वातंत्र्यासाठी सार्वमत घेण्यात आले होते व त्यात बहुसंख्य लोकांनी कौल दिल्याचा दावा करून प्रांतिक कायदेमंडळाने स्वतंत्र होण्याचा ठरावही मंजूर केला होता. स्पेनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घटनात्मक पेच मानला जात आहे. (वृत्तसंस्था)