शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तमध्ये कार बॉम्बच्या आत्मघातकी स्फोटात 10 जण ठार

By admin | Updated: July 7, 2017 16:54 IST

इजिप्तच्या उत्तरेकडचा सिनाई प्रांत आज बॉम्बस्फोटानं हादरला आहे.

ऑनलाइन लोकमतकाहिरा, दि. 7 - इजिप्तच्या उत्तरेकडचा सिनाई प्रांत आज बॉम्बस्फोटानं हादरला आहे. सिनाई प्रांतातील सेनेच्या एका चेकपोस्टवर झालेल्या आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात कर्नलसह 10 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रफाह आणि शेख जुवैद यादरम्यान असलेल्या एका चेकपोस्टवर दोन कारमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला आहे. या कार बॉम्बस्फोटात 10 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मात्र अद्यापही कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. उत्तर सिनाई हा दहशतवादी संघटन असलेल्या इसिसचा बालेकिल्ला समजला जातो. 2013पासून आतापर्यंत या भागात पोलीस आणि सेनेचे हजारो सैनिक मारले गेले आहेत. मात्र या आत्मघातकी बॉम्बस्फोटानं इजिप्त पुन्हा एकदा हादरलं आहे.

गेल्या दिवसांपूर्वी मध्य इजिप्तमध्ये आठ ते दहा बंदुकधाऱ्यांनी चालू बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर यामध्ये 25 जण गंभीर जखमी झाले होते. कॉप्टिक ईसाइ (ख्रिस्ती) ला घेऊन जाणाऱ्या एका बसवर गोळीबार झाला होता. यामध्ये मृत झालेल्यात लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले होते. ईसाइ (ख्रिस्ती) समाजावर झालेला हा या दोन महिन्यांतील दुसरा मोठा हल्ला होता.

काहिरावरुन 250 किमी दक्षिण भागात अंबा शमुवेल मोनेस्ट्रीकडे जात असताना बंधुकधाऱ्यांनी हा हल्ला केल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले होते. मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. अद्याप या हल्याची जबाबदारी कोणही घेतलेली नाही. सुरक्षा दलांनी याचा तपास सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, जवानांच्या पोशाखात असलेल्या आठ ते दहा जणांनी चालू बसवर गोळीबार केला होता. यावेळी तिथे मृत्यूचे तांडव उभे राहिले होते. सगळीकडे कर्कश आवाज येत होता. इजिप्तमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली होती. टंटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाला होता.
(इजिप्तमध्ये दोन स्फोटांत ४५ जण ठार)
गेल्या काही दिवसांपूर्वी इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) इजिप्तमधील तानता आणि अलेक्झांड्रिया शहरात चर्चेसमध्ये रविवारची प्रार्थना सुरू असताना केलेल्या दोन बॉम्बस्फोटांत 45 जण ठार तर 140 जण जखमी झालेत. देशातील अल्पसंख्य ख्रिश्चनांवर गेल्या काही वर्षांत झालेला हा भीषण हल्ला आहे.