शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 16:01 IST

Israel Iran War : इराणला टारगेट करण्यास इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Israel Iran War: इराण आणि इस्रायल यांच्यामधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराणने अलीकडेच इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हा इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यानंतर आता इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाकडून मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलने आता इराणमधील सत्ताबदल आपले ध्येय बनवले आहे.

इराणला टारगेट करण्यास इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आला. इराणने इस्रायलवर हल्ला केल्यापासून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांची टीम इस्रायलच्या निशाण्यावर आहे. इस्रायलने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांच्या टीमला सत्तेवरून हटवण्याची आणि इराणी लोकांना कट्टरतावादी राजवटीपासून मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. 

इराणमध्ये सत्ताबदल झाल्याशिवाय इस्रायल स्वतःला सुरक्षित समजत नाही. इराणची राजवट उलथून टाकण्याबाबत इस्रायलने अमेरिकेशी यापूर्वीच चर्चा केली आहे. इस्रायलने पाच तासांची मॅरेथॉन बैठक घेतली आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांच्यात ३० मिनिटे चर्चा झाली. तसेच, इस्रायलसाठी धोकादायक बनलेल्या इराणची राजवट उलथून टाकण्याची ब्लू प्रिंट अमेरिकेने तयार केली आहे.

इराणने इस्रायलवर केला होता हल्ला इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर हल्ला केला, ज्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला. हसन नसराल्लाहच्या मृत्यूनंतर इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला आणि इस्रायलवर १८० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यानंतर अमेरिकेनेही इस्रायलला पाठिंबा देत हा हल्ला निष्फळ असल्याचे म्हटले. त्याचवेळी इस्रायलने असा दावाही केला होता की, आमच्या अॅडव्हान्स हवाई क्षेत्रामुळे इराणने डागलेले क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की, इराणला त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि जो कोणी आमच्यावर हल्ला करेल आम्ही त्यांच्यावर हल्ला करू.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणInternationalआंतरराष्ट्रीयBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू