शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनच्या महाराणीचा तनखा वाढला

By admin | Updated: June 30, 2017 00:33 IST

ब्रिटनच्या सम्राज्ञी आणि राष्ट्रकुलाच्या प्रमुख महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शाही तनख्यात ब्रिटिश सरकारने तब्बल ७८ टक्क्यांनी वाढ केली आहे.

लंडन : ब्रिटनच्या सम्राज्ञी आणि राष्ट्रकुलाच्या प्रमुख महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शाही तनख्यात ब्रिटिश सरकारने तब्बल ७८ टक्क्यांनी वाढ केली आहे. अलीकडच्या काळात तनख्यात झालेली ही सर्वांत मोठी वाढ आहे.सन २०१६-१७मध्ये महाराणी एलिझाबेथ यांना शाही तनखा म्हणून सरकारी तिजोरीतून ४२.८ दशलक्ष पौंड देण्यात आले. आता ही रक्कम ७६.१ दशलक्ष पौंड करण्यात आली आहे. हा तनखा पुढील १० वर्षे कायम राहील.शाही कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या बकिंगहॅम राजप्रासादाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. प्रामुख्याने तो खर्च लक्षात घेता तनखा वाढविला आहे. अभ्यागतांना अधिक सुलभतेने ये-जा करता यावी यासाठी राजप्रासादात बदल केले जातील. शिवाय ६० वर्षांहून अधिक जुने वायरिंग व पाइपही बदलले जातील.शाही तिजोरीच्या मंजूर हिशेबानुसार सन २०१६-१७मध्ये शाही कुटुंबाचा खर्च ५६.८ दशलक्ष पौंड एवढा झाला. त्यापैकी ४२.८ दशलक्ष पौंड सरकारी तिजोरीतून देण्यात आले व बाकीची रक्कम शाही मालमत्तांमधून उत्पन्न म्हणून मिळाली. अनेक भव्य इमारती, प्रासाद व अन्य इमारती, अनेक फार्म आाणि कित्येक समुद्रकिनारे शाही मालकीचे आहेत. त्यातून मिळणारे उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा होते व त्यापैकी ठरावीक रक्कम राजघराण्यातील व्यक्तींना त्यांच्या शाही जबाबदाऱ्या व कार्यक्रम पार पाडण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते. (वृत्तसंस्था)