शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

स्तनपान देणाऱ्या मातेस बाहेर हाकलले!

By admin | Updated: July 15, 2015 03:13 IST

स्तनपान हा प्रत्येक बाळाचा आणि त्याच्या मातेचा मुलभूत मानवी हक्क असूनही आणि आधुनिक वैद्यकशास्त्रही स्तनपानाचा आग्रही पुरस्कार करू लागले असताना

लंडन : स्तनपान हा प्रत्येक बाळाचा आणि त्याच्या मातेचा मुलभूत मानवी हक्क असूनही आणि आधुनिक वैद्यकशास्त्रही स्तनपानाचा आग्रही पुरस्कार करू लागले असताना, गर्दीपासून दूर जाऊन आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला स्तनपान देणाऱ्या एका मातेस, एका लोकप्रिय डिपार्टमेंटल स्टोअरमधून, सक्तीने बाहेर हाकलून दिल्याची घटना पुढारलेल्या ब्रिटनमध्ये घडली आहे.चार मुलांची आई असलेल्या कॅरोलिन स्टॉर्मर या महिलेच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. लिचेस्टर परगण्यातील ‘प्रायमार्क’ या अग्रगण्य डिपार्टमेंटल स्टोअरच्या सुरक्षा रक्षकाने स्तनपान करणाऱ्या मुलीस हिसकावून घेतले व कॅरोलिनला स्टोअरबाहेर काढले. कॅरोलिनने या प्रकाराची पोलिसांतही रीतसर फिर्याद नोंदविली आहे. स्तनपानाचा पुरस्कार करणाऱ्या ‘फ्री टू फीड’ या फेसबूकवरील सपोर्ट ग्रुपवर कॅरोलिनने आपला हा अनुभव पोस्ट केल्यापासून टीकेचे मोहोळ उठले आहे. कॅरोलिनच्या पतीने स्टोअरच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यावर ‘प्रायमार्क’ने सारवासारव केली. टीकेची दखल घेऊन स्टोअरच्या व्यवस्थापनानेही फेसबूकवर पोस्ट टाकले. त्यात त्यांनी म्हटले की, आमच्या स्टोअरमध्ये माता आपल्या मुलांना अगदी खुशाल स्तनपान देऊ शकतात. या घटनेची आम्ही चौकशी करीत आहोत. कॅरोलिनने तिच्या फेसबूक पोस्टमध्ये विषद केलेला सर्व घटनाक्रम स्टोअरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही अगदी स्पष्टपणे टिपला गेला आहे. त्याच्या साह्याने पोलिसही तपास करीत आहेत. (वृत्तसंस्था)तामिळनाडूत बसस्थानकावर स्वतंत्र खोलीब्रिटनसारख्या पुढारलेल्या देशात घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतात तमिळनाडू सरकारने अलीकडेच घेतलेला निर्णय किती पुरोगामी आहे हेच अधोरेखित होते. मातेने पदराखाली घेऊन आपल्या अपत्यास स्तनपान देणे हे खरे तर अगदी नैसर्गिक आहे. पण बघणाऱ्यांच्या नजरेत खोट असते त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्तनपान देताना महिलांची मोठी कुचंबणा होते. हे लक्षात घेऊनच तमिळनाडू सरकारने राज्यभरातील एस.टी. स्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र खोलीची सोय करण्याचे ठरविले आहे.