शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोना लस लवकरात लवकर पाठवा"; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींना कळकळीची विनंती

By देवेश फडके | Updated: January 9, 2021 13:57 IST

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून कोरोनाची लस पाठवण्याची विनंती केली आहे. ब्राझीलमध्ये अद्याप लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला नाही.

ठळक मुद्देकोरोनामुळे सर्वाधिक प्रभाव पडलेल्या देशांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या स्थानावरब्राझीलमध्ये अद्याप लसीकरणाला प्रारंभ नाहीलस लवकर पाठवण्याबाबत राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

ब्रासिलिया : नववर्षाच्या सुरुवातीलाच सीरम इन्स्टिट्यूच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. यानंतर लवकरच भारतात लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून कोरोनाची लस पाठवण्याची विनंती केली आहे. 

कोरोना संसर्गाने जागतिक पातळीवर थैमान घातले आहे. कोरोना नियंत्रण अद्याप कोणत्याही देशात झालेले नाही. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभाव पडलेल्या देशांच्या यादीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये अद्याप लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला नाही. लसीकरणाला सुरुवात न झाल्यामुळे देशवासीयांना सरकारवर दबाव वाढत चालला आहे. यामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताकडे मदत मागितली असून, कोरोना लस शक्य तितक्या लवकर पाठवण्याची विनंती पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना केल्याची माहिती मिळाली आहे. 

ब्राझीलच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून एक पत्र पाठवण्यात आले आहे. भारतातील लसीकरण मोहिमेत कोणताही खंड पडू न देता ब्राझीलमधील राष्ट्रीस लसीकरणाचा प्रारंभ करण्यासाठी कोरोना लसीचे २० लाख डोस पाठवण्यात यावेत, अशी मी विनंती करतो, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

ब्राझील सरकार द्वारा संचालित फियोक्रूझ बायोमेडिकल सेंटरने एस्ट्राजेनेका नामक लसीचे लाखो डोस या महिन्याच्या अखेरपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही, असे सांगितले. ब्राझीलमध्ये तातडीने कोणतीही लस उपलब्ध होण्याची शक्यता धुसर असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी भारताकडून लस मिळण्याबाबत पत्र पाठवल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भारतातून येणाऱ्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी द्यावी, अशी विनंती फ्रियोक्रूझकडून ब्राझील सरकारला करण्यात आली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याBrazilब्राझीलprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी