शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशाच्या राष्ट्रपतींनीच सोशल डिस्टंसिंगला बसवले धाब्यावर, रस्त्यावर दिसताच नागरिकांनी 'असा' व्यक्त केला रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 12:30 IST

ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो हे शुक्रवारी केवळ रस्त्यांवर दिसले नाही, तर ते मिलट्री हॉस्पिटल, मेडिकल आणि नंतर आपल्या एका मुलालाही भेटायला गेले.

ठळक मुद्देब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो शुक्रवारी थेट ब्राझीलच्या रस्त्यांवरच दिसून आलेएका ठिकाणी समर्थकांनी त्यांचे स्वागतही केलेबोल्सोनारो काही नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले

रियो दी जेनेरियो : कोरोना विरोधात सध्या संपूर्ण जगाचे युद्ध सुरू आहे. या युद्धात सामाजिक अंतर अथवा सोशल डिस्टंसिंग हे शस्त्र अत्यंत प्रभावी ठरत आहे. मात्र, जगात एक देश असाही आहे, जेथे खुद्द राष्ट्रपतीच सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासत आहेत. हो, या देशाचे नाव आहे ब्राझील. येथील राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो शुक्रवारी थेट ब्राझीलच्या रस्त्यांवरच दिसून आले.

वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो हे शुक्रवारी केवळ रस्त्यांवर दिसले नाही, तर ते मिलट्री हॉस्पिटल, मेडिकल आणि नंतर आपल्या एका मुलालाही भेटायला गेले. एवढेच नाही, तर एका ठिकाणी समर्थकांनी त्यांचे स्वागतही केले. असे असले, तरी त्यांना काही नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. काही लोकांनी तर रागाच्या भरात भांडेही फेकले. ब्राझीलच्या राष्ट्रपतींना सोशल डिस्टंसिंगशी काही एक देणे घेणे नाही, अशी टिकाही येथील काही लोकांनी केली आहे.

खरेतर, ब्राझीलचे राष्ट्रपती कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी केल्या जात असलेल्या सोशल डिस्टंसिंग उपायाच्या विरोधात आहेत. सोशल डिस्टंसिंगमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडेल. कोरोना म्हणजे एक साधारण आजार आहे, असे त्यांना वाटते. कोरोना संकटात बोल्सोनारो यांची लोकप्रियता कमी झाली आहे. ब्राझीलमध्ये जसजशी कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, तसतसा लोकांचा रागही वाढत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनोपासून बचाव करण्यासाठी ब्राझीलमधील मोठ-मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. येथे शुक्रवारपर्यंत  1,057 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आतापर्यंत येथे एकूण 19,638 कोरोना बाधित सापडले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBrazilब्राझीलPresidentराष्ट्राध्यक्षMedicalवैद्यकीय