शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

ब्रिटनमध्ये पुन्हा बोरीस जॉन्सन यांचे सरकार; कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला ३६३ पेक्षा अधिक जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 02:53 IST

‘ब्रेक्झिटचा अडथळा दूर करण्याची नवी पहाट’

लंडन : ब्रिटनमधील निवडणुकीत कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी मोठा विजय मिळविला आहे. १९८० च्या दशकात मार्गारेट थॅचर यांच्या नेतृत्वात मिळालेल्या विजयानंतर प्रथमच कन्झर्व्हेटिव्ह पार्टीने संसदेत ३६३ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळविला आहे.

ब्रेक्झिटवरील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही नवी पहाट आहे, अशी प्रतिक्रिया जॉन्सन यांनी दिली आहे, तर मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला आहे. विजय रॅलीत आपल्या महिला सहकारी कॅरी सायमंड यांच्या उपस्थितीत बोलताना जॉन्सन म्हणाले की, आम्ही करून दाखविले. आम्ही अडथळा पार केला आहे. यावेळी लोकांनी ‘बे्रक्झिट होणारच’ अशा घोषणा दिल्या.

जॉन्सन हे लवकरच बकिंघम येथे पॅलेसमध्ये जाऊन महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेणार आहेत. जॉन्सन यांनी स्वत: लंडनच्या उक्सब्रिज आणि साऊथ रुइस्लिप येथून विजय मिळविला आहे. युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी हा मजबूत जनादेश असल्याचे ते यावेळी म्हणाले. हा केवळ बे्रक्झिटसाठी नव्हे, तर देशाला एकजूट करण्यासाठी लोकांचा कौल असल्याचेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

लेबर पार्टीचे जेरेमी कॉर्बिन यांचा राजीनामा

या निवडणुकीत विरोधी पक्ष लेबर पार्टीला ६५० सदस्यांच्या हाऊस आॅफ कॉमन्समध्ये केवळ २०३ जागा मिळाल्याआहेत. त्यानंतर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, लेबर पार्टीसाठी निराश करणारे हे निकाल आहेत. मी भविष्यात कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीसाठी पक्षाचे नेतृत्व करणार नाही. काश्मिरात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी करणारा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या पक्षाची कथित भारतविरोधी प्रतिमा तयार झाली. यानंतर लेबर पार्टीसोबत राहणारे भारतीय वंशाचे लोक त्यांच्यापासून दूर गेले.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानInternationalआंतरराष्ट्रीय