शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ब्रेक्झिटचे खंदे समर्थक बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 17:41 IST

थेरेसा मे लवकरच राजीनामा देणार

लंडन: कंझर्व्हेटिव्ह पक्षानं बोरिस जॉन्सन यांची नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. जॉन्सन यांना ९२,१५३ (६६ टक्के) मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जेरेमी हंट यांना ४६,६५६ मतं मिळाली. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या एकूण १,५९,३२० सदस्यांपैकी ८७.४ टक्क्यांनी पक्षाचा नेता निवडण्यासाठी मतदान केलं होतं. बोरिस जॉन्सन ब्रेक्झिटचे खंदे समर्थक आहेत. यासाठी त्यांनी अभियानदेखील राबवलं होतं. जॉन्सन यांची पक्षनेतेपदी निवड झाल्यानं सध्या पंतप्रधानपद भूषवत असलेल्या थेरेसा मे त्यांचा राजीनामा राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे सोपवतील. त्याआधी त्या संसदेत पंतप्रधान म्हणून प्रश्नांचा सामना करतील. ब्रेक्झिटसाठी मतदान झाल्यानंतर डेव्हिड कॅमेरुन यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर थेरेसा मे यांनी देशाचं नेतृत्त्व केलं.ब्रिटनच्या जनतेनं तीन वर्षांपूर्वी ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिला. मात्र अद्यापही याबद्दलची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आव्हान जॉन्सन यांच्यासमोर असेल. विशेष म्हणजे जॉन्सन यांच्या पक्षातील परिस्थितीदेखील त्यांच्यासाठी फारशी अनुकूल नाही. जॉन्सन यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊ, अशी भूमिका चॅन्सलर फिलिप हेमंड यांच्यासह अनेक प्रमुख कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली आहे.