सोशल मीडीयात अनेक ट्रेण्ड येतात जातात,मात्र ते करताना माणसं संवेदनशिलता विसरतात का? आणि विनोद करण्याच्या नादात माणुसकीची पातळी सोडतात का यावर बराच खल होतो, त्याचंच अलिकडचं एक उदाहरण म्हणजे ‘बूमर रिमुव्हर’ नावाचा एक ट्रेण्ड.खरंतर बुमर रिमुव्हर असा एक हॅशटॅग अलिकडेच अनेक सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर विशेषतष इन्स्ट्राग्राम, टिकटॉक आणि ट्विटरवर चालला. आपल्या घरात किंवा अवतीभोवती असलेले आजीआजोबा यांची काळजी घेणा:या, त्यांना मदत करणा:या, उमेद देणा:या अनेक पोस्ट तरुणांनी शेअर केल्या.त्यासाबेत हा ‘बुमर रिमुव्हर’ असा हॅशटॅग मोठय़ा प्रमाणात ट्रेण्डही झाला.जे लोक 1946 ते 1964 या काळात जन्माला आले, जे आता वयस्क आहे,त्यांना कोरोनाने गाठण्याचा धोका अधिक आहे असं जगभरात सांगण्यात येतं. हाय रिस्क म्हणून त्यांची नोंद होते.तर त्यांची काळजी घ्यावी म्हणून हा ट्रेण्ड सुरु झाला.
बूमर-रिमूव्हर : विनोदाची पातळी सोडून भरकटलेला एक ट्रेण्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 14:07 IST
विनोद करण्याच्या नादात माणुसकीची पातळी सोडतात का यावर बराच खल होतो, त्याचंच अलिकडचं एक उदाहरण म्हणजे ‘बूमर रिमुव्हर’ नावाचा एक ट्रेण्ड.
बूमर-रिमूव्हर : विनोदाची पातळी सोडून भरकटलेला एक ट्रेण्ड
ठळक मुद्देयाकाळाच्या मानसिकतेचा एक चेहरा म्हणून हा ट्रेण्ड जे सांगायचं ते सांगून गेलाच.