शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये स्फोट, १८ जखमी, दहशतवादी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:42 IST

सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी वर्दळीच्या भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत १८ प्रवासी जखमी झाले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी रेल्वेच्या एका डब्यात स्फोट झाला.

लंडन : सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी वर्दळीच्या भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत १८ प्रवासी जखमी झाले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी रेल्वेच्या एका डब्यात स्फोट झाला.हा स्फोट बकेट बॉम्बचाच असल्याचा संशय पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केला असून, या स्फोटासाठी अद्ययावत स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टीकच्या बादलीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली. स्फोटाच्या ठिकाणी तेलकट रासायनिक पदार्थाचे ओघळ दिसून आले. स्फोटामुळे प्रवाशांत घबराट पसरली. प्रवाशांची ट्रेनमधून बाहेर पडण्याची धडपड चालू होती. अनेकांचे चेहरे होरपळले.पार्सन्स ग्रीन स्टेशनवर भुयारी रेल्वे पोहोचण्याआधी स्टेशनवर उतरण्यासाठी प्रवासी दरवाज्याजवळ पोहोचले होते. याच ट्रेनची वाट पाहत फलाटावर प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. प्रवाशांची जीव वाचविण्यासाठी धडपड चालू होती. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने पार्सन्स ग्रीन स्टेशनकडे धाव घेऊ न या प्रकाराची चौकशी सुरू केली. घटनास्थळी शहर पोलीस सेवा, ब्रिटिश वाहतूक पोलीस आणि लंडन अग्निशमन पथकासोबत रुग्णवाहिका सेवा पथकाने मदत व बचाव कार्य सुरू केले. या ट्रेनने बव्हंशी नोकरदार व विद्यार्थी प्रवास करतात. पंतप्रधान तेरेसा मे यांनी घटनेची माहिती घेतली.स्टेशनची नाकेबंदीस्फोट नेमका कशाचा होता आणि आग कशाने भडकली, याचा तपास दहशतवादविरोधी पथक करीत आहे. पार्सन्स ग्रीन स्टेशन रिकामे करून पोलिसांनी चोहोबाजूने स्टेशनला वेढा घालून नाकेबंदी केली आहे. शहर पोलिसांनी सांगितले की, प्लास्टीक बादलीत वा कचरापेटीत हा स्फोट झाला, असे लोक सांगत आहेत. आम्ही तपास करीत आहोत.

टॅग्स :Englandइंग्लंड