शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

BMM अधिवेशन! अमेरिकेत मराठी ‘उत्तररंगा’ची तयारी; फॉर हियर, फॉर शुअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 07:34 IST

सान होजे बीएमएम अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर विशेष चर्चासत्र; मराठी भाषा शिकण्यासाठीही उपक्रम 

सान होजे : सगळे आयुष्य कामात उत्तम जाते... उतारवयात काय हवे असते माणसाला?- दोन एफ लागतात फक्त... आवडीचे फुड आणि जीवाभावाचे फ्रेंडस! फ्लोरिडामध्ये राहणारे अविनाश आणि नीलिमा पटवर्धन सान होजेमधल्या हिल्टन हॉटेलच्या लॉबीमध्ये ‘ लोकमत’ शी बोलत होते. कर्तेपणाचे सारे आयुष्य अमेरिकेत उत्तमप्रकारे पार पाडल्यावर निवृत्त झालेले आणि मित्रमैत्रिणींच्या भेटीच्या ओढीने बीएमएम अधिवेशनाला येणारे त्यांच्यासारखे ज्येष्ठ नागरिक बहुसंख्य ! परदेशात वयस्क होणारी ही मराठी माणसांची पहिलीच पिढी ! 

ज्या लोकांचा साहित्यिक, सांस्कृतिक, व्यक्तिगत एकटेपणा दूर व्हावा म्हणून उत्तर अमेरिकाभर महाराष्ट्र मंडळे स्थापन झाली, त्याच लोकांच्या उत्तरायुष्यातले प्रश्न सोडविण्यासाठी आता बृहन्महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. विद्या आणि अशोक सप्रे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी या धडपडीचे नाव ठेवले ‘ उत्तररंग’! आता बीएमएम अधिवेशनात उत्तररंगसाठी पहिला अख्खा दिवस राखून ठेवलेला असतो. सान होजे येथल्या एकविसाव्या अधिवेशनाचा पूर्वरंगही हीच चर्चा करणारा असेल.

स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी नऊ वाजता ‘लोकमत’च्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर यांच्या बीजभाषणाने या दिवसाची सुरुवात होईल. बीएमएमचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांनी उत्तररंग या उपक्रमाला गती दिली. आता अमेरिकेतल्या आनंदी वानप्रस्थाश्रमाच्या तयारीला वेग आला आहे.

बीएमएम २.० : अमेरिकेत मराठी शाळा, उद्योजकता विकास 

  • अमेरिकाभरात विखुरलेल्या मराठी मंडळांनी बसविलेल्या एकांकिकांची स्पर्धा हे यावर्षीच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य होय ! गुरुवारी दिवसभर ही स्पर्धा रंगेल.
  • अमेरिकन मराठी घरांमधल्या मुलांनी मराठी भाषा शिकावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी शाळांचा उपक्रम जोमाने सुरू आहे. अधिवेशनात या उपक्रमात सहभागी लोकांसाठी विशेष आयोजन केलेले आहे.
  • बी कनेक्ट या शीर्षकाअंतर्गत मराठी उद्योजकता विकासाची विशेष सत्रेही गुरुवारी होतील.

सिलिकॉन व्हॅलीमध्ये घुमणार ढोलताशांचा जल्लोष सान होजे कन्व्हेन्शन सेंटरच्या विस्तीर्ण आवारात उभारलेल्या तुळशी वृंदावनाला लागून असलेल्या जागेत बुधवारची रात्र जागविली ती अमेरिकेतून आलेल्या आठ ढोल पथकांनी ! एरवी अमेरिकेतल्या सॉफ्ट वेअरपासून बँकिंगपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे हे तरुण भारतातून आलेल्या नव्याकोऱ्या ढोलांच्या वाद्या आवळण्यात गर्क होते का. का?- कारण यावर्षीच्या बीएमएममध्ये चक्क आठ ढोल-ताशा पथकांची खणखणीत स्पर्धा होणार आणि त्यात भरघोस बक्षीसही मिळणार आहे. कन्व्हेन्शन सेंटरला लागून असलेल्या हिल्टन आणि मरियट या दोन्ही हॉटेल्समधल्या देशी-विदेशी पाहुण्यांची पावले आत्तापासूनच ढोल ताशांभोवती रेंगाळू लागली आहेत.

टॅग्स :Americaअमेरिकाmarathiमराठी