शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

संसद बरखास्त करणाऱ्या पंतप्रधान ओलींना दणका; नेपाळ सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 09:22 IST

Nepal K.P.Oli Sharma : ओली यांना सर्वोच्च न्यायालयानं दिला मोठा दणका, काही दिवसांपूर्वी संसद बरखास्त करण्याचा घेतला होता निर्णय

ठळक मुद्देओली यांनी काही दिवसांपूर्वी संसद बरखास्त करण्याचा घेतला होता निर्णयसंसद बरखास्त करण्याच्या निर्णयाला राष्ट्राध्यक्षांनीही दिली होती मंजुरी

काही दिवसांपूर्वी नेपाळचेपंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी नेपाळची संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्या देवी भंडारी यांनी त्याला मंजुरीही दिली होती. परंतु आता नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयानंपंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांचा तो निर्णय उलटवला आहे. न्यायालयानं ओली यांना १३ दिवसांमध्ये संसदेचं अधिवेशन बोलवण्याचे आदेश दिले. २० डिसेंबर रोजी ओली यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यांच्या या निर्णयाविरोधात नेपाळच्या सर्वोच्च अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर मंगळवारी सुनावणी पार पडली.संसद बरखास्त करण्याच्या निर्णयानंतर ओली यांनी घटनात्मक संस्थांमध्ये केलेल्या नियुक्त्यांनाही न्यायालयानं रद्द केलं. ओली यांनी घटनात्मक संस्थांमध्ये अनेक नियुक्त्या केल्या होता. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर के.पी.ओली शर्मा यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. दरम्यान, आता ओली यांना पंतप्रधानपदी राहण्याचा कोणताही हक्क नसल्याचं मत प्रचंड यांच्या गटानं व्यक्त केलं. संसद बरखास्त केल्यानंतर नेपाळमध्ये निवडणुकांच्या घोषणाही करण्यात आल्या होत्या. ३० एप्रिल आणि १० मे रोजी नेपाळमध्ये निवडणुका पार पडणार होत्या. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नेपाळची जुनी संसद पुन्हा कार्यरत झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान ओली आणि सत्तारुढ पक्ष सीपीएनचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. प्रचंड यांच्या गटानं ओली यांच्यावर संसदीय दल आणि केंद्रीय समितीमध्ये बहुमत गमावण्याचा आरोप करत ओली यांनी संसद बरखास्त करून असंवैधानिक काम केल्याचं म्हटलं होतं. प्रचंड यांच्या सात समर्थक खासदारांनी यानंतर आपला राजीनामा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर प्रचंड समर्थक गटानं समाधान व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :NepalनेपाळSupreme Courtसर्वोच्च न्यायालयprime ministerपंतप्रधान