शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या महामार्गावर झाला विचित्र अपघात

By admin | Updated: July 15, 2017 13:35 IST

अमेरिकेच्या महामार्गावर अत्यंत विचित्र अपघात घडला आहे.

ऑनलाइन लोकमत

वॉशिग्टन, दि. 15- रस्त्यावर टँकर पलटून तेल सांडणं, गाडी डिव्हायडरवर आदळून अपघात होणं किंवा काही गाड्यांची एकत्र तोडफोड होणं असे अपघात आपण पाहतं असतो. बऱ्याचदा रस्त्यावर विचित्र अपघात झाल्याचंही पाहायला मिळतात. पण अमेरिकेच्या महामार्गावर अत्यंत विचित्र अपघात घडला आहे. साडेतीन हजार किलोपेक्षा जास्त ईल माशांना घेऊन एक ट्रक निघाला होता. पण ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातादरम्यान ट्रकमध्ये असणारे ईल मासे रस्त्यावर पडले होते. हे मासे रस्त्यावर पडल्यावर त्यांच्या शरीरातून पांढऱ्या रंगाचा पदार्थ बाहेर पडायला सुरूवात झाली होती. अपघातात मासे रस्त्यावर पडले आणि त्यामुळे पांढरा चिकट पदार्थ रस्त्यावर पसरला. खरंतर जेव्हा हे मासे एखाद्या परिस्थितीत सापडतात तेव्हा त्यांच्या शरीरातून चिकट पदार्थ बाहेर पडतो. अमेरिकेच्या हायवेवरील या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.
 
महामार्गावर अपघात झाल्याने तेथून जाणाऱ्या गाड्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पांढरा चिकट पदार्थ रस्त्यावर पसरल्याने गांड्याना पुढे जाणं कठीण झालं होतं. त्यामुळे गाड्यांचं नुकसानही झालं आहे. . हे मासे रस्त्यावरून साफ करायला बरीच मेहनतही करावी लागली. अमेरिकेच्या महामार्ग क्रमांक 101 वर  ही घटना घडली आहे. रस्त्याची साफसफाई करताना बऱेच मासे मारले गेले आहेत. ईल माशांना हॅगफिश असंही बोललं जातं. ईल मासे त्यांच्या ग्रंथीतून पांढरा चिकट पदार्थ शरीराबाहेर सोडत असतात. त्यामुळे समुद्रात असताना इतर मोठ्या माशांपासून त्यांना त्यांच रक्षण करता येतं.  प्रशांत महासागच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात ईल मासे आढळून येतात. 
आणखी वाचा
 

भुशी धरण ओव्हर फ्लो, पर्यटकांना पाय-यांवर जाण्यास मज्जाव

दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद

डेंग्यू, मलेरियाला "या" माशांमुळे बसणार आळा

काही दिवसांपूर्वी व्हिएन्नाच्या रस्त्यावर कोंबड्यांना घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर उलटला होता. ट्रक उलटल्याने ट्रकच्या आतमधील जिवंत कोंबड्या असणारे लहान पिंजरे रस्त्यावर पडले. ट्रक रस्त्यावर उलटल्यानंतर अनेक पिंजऱ्यातील कोंबड्यांचा मृत्यू झाला. पण काही कोंबड्या यावेळी पिंजऱ्यातून बाहेर आल्या होत्या. त्यानंतर कोंबड्यांना महामार्गावर मोठा गोंधळ निर्माण केला. रस्त्यावर सगळीकडे कोंबड्या फिरत असल्याने तेथे वाहतुकीची चांगलीच तारांबळ उडाली होती. ट्रकमध्ये जवळपास सात हजारांहून अधिक कोंबड्या होत्या.