शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या अण्वस्त्रांपासून जगाला सर्वाधिक धोका; अमेरिकचे अध्यक्ष जो बायडेन यांची स्पष्टोक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 06:33 IST

पाकिस्तानला आजवर सर्व प्रकारची भरीव मदत करणाऱ्या देशाच्या प्रमुखाने असे विधान केल्याने याला विशेष महत्त्व आहे. 

वॉशिंग्टन : पाकिस्तानकडे कोणत्याही नियंत्रणाविना अण्वस्त्रे असल्याने तो जगातील सर्वांत धोकादायक देशांपैकी एक आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या एका कार्यक्रमात बोलताना जागतिक स्तरावरील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले. पाकिस्तानला आजवर सर्व प्रकारची भरीव मदत करणाऱ्या देशाच्या प्रमुखाने असे विधान केल्याने याला विशेष महत्त्व आहे. 

पाश्चात्य देशांनी पाकिस्तानकडील अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली आहे. पाकची अण्वस्त्रे दहशतवादी किंवा जिहादी घटकांच्या हाती पडू शकतात, अशी चिंता त्यांना सतावत आहे. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अण्वस्त्रांची गरज असल्याचे सांगून पाकिस्तानने मे १९९८ पासून अणुचाचणी घेणे सुरू केले. तेव्हापासून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना पाककडील अण्वस्त्र साठा चुकीच्या हातांत पडण्याच्या भीतीने पछाडलेले आहे. (वृत्तसंस्था) 

तालिबान्यांच्या विजयाने चिंता आणखी वाढली 

या भीतीत अफगाणिस्तानातील तालिबानच्या विजयानंतर पाकमधील जिहादी सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करू शकतात, या शक्यतेचीही भर पडली आहे, असे ब्रुकिंग्स येथील परराष्ट्र धोरण कार्यक्रमाचे अनिवासी वरिष्ठ संशोधक मर्विन काल्ब यांनी गेल्यावर्षी लिहिले होते. अफगाणिस्तानातून सुरक्षा दले झपाट्याने काढून घेतल्यामुळे पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या सुरक्षेला धोका  निर्माण होऊ शकतो, असा इशारा वरिष्ठ अमेरिकी लष्करी अधिकारी मार्क मिले यांनी दिला होता. 

माजी मुख्य न्यायाधीशांची हत्या

बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मोहंमद नूर मेस्कनजई यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी मशिदीतून परत येताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनPakistanपाकिस्तान