शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

मोठी बातमी: हाडे गोठवणाऱ्या थंडीत १०० किमी मॅरेथॉन, २१ स्पर्धकांचा मृत्यू; स्पर्धेदरम्यान भयावह दुर्घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 11:59 IST

Gansu Marathon: हाडे गोठवणाऱ्या थंडीत आयोजित करण्यात आलेल्या १०० किमीच्या या स्पर्धेत शेकडो धावपटू सहभागी झाले होते. ही मॅरेथॉन स्पर्धा जिंगताई कौंटीमधील यलो रिव्हर स्टोन फॉरेस्ट टुरिस्ट साईटमध्ये आयोजित करण्यात आली होती.

बीजिंग - चीनच्या गांसू प्रांतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रॉस-कंट्री माऊंटन मॅरेथॉनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. या स्पर्धेदरम्यान २१ धावपटूंचा मृत्यू झाला आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीत आयोजित करण्यात आलेल्या १०० किमीच्या या स्पर्धेत शेकडो धावपटू सहभागी झाले होते. ही मॅरेथॉन स्पर्धा जिंगताई कौंटीमधील यलो रिव्हर स्टोन फॉरेस्ट टुरिस्ट साईटमध्ये आयोजित करण्यात आली होती. हिमवृष्टी, मुसळधार पाऊस आणि वादळामध्ये अडकल्याने या धावपटूंचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  (100 km marathon, 21 runners die in freezing cold; Terrible accident during the competition in China) गांसू मॅरेथॉनचे आयोजन गेल्या महिन्यात २३ मे रोजी करण्यात आले होते. मदत आणि बचाव कार्यात सहभागी झालेल्या लोकांनी सांगितले की, सर्व मृत धावपटू कडाक्याच्या थंडीमुळे हायपोथर्मियाची शिकार झाले. मृत धावपटूंमध्ये चीनमधील नागरिकांची संख्या अधिक आहे. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या सीजीटीएनने सांगितले की, मृत धावपटूंमध्ये लिआंग जिंग आणि हुआंग गुआनजून यांच्या नावांचाही समावेश आहे. हे दोघेही चीनमधील आघाडीचे मॅरेथॉन धावपटू आहेत. 

गांसू मॅरेथॉनची सुरुवात २०१८ मध्ये करण्यात आली होती चिनी अॅथलेटिक असोसिएशनने या स्पर्धेला ब्राँझ मेडल इव्हेंट असे नाव दिले आहे. यामध्ये मुख्यत्वेकरून तीन गटांमध्ये स्पर्धा होते. पहिल्या गटात ५ किलोमीटर, दुसऱ्या गटात २१ किमी आणि तिसऱ्या गटात १०० किमी शर्यत होते. क्रॉसकंट्री मॅरेथॉनमधील ही सर्वात अवघड आणि धोकादायक स्पर्धा मानली जाते.  या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधीपासूनच अशा प्रकारच्या कुठल्याही स्पर्धेत भाग घेतलेला असणे आवश्यक असते.  

ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण क्रॉस कंट्री स्पर्धा मानली जाते. सहभागी स्पर्धकांना समुद्र सपाटीपासून २००० मीटर उंचावर आपली क्षमता दाखवावी लागले. या शर्यतीमधील बहुतांश मार्ग निर्मनुष्य आहे. धावपटूला २० तासांच्या आत हे अंतर पार करावे लागते. १०० किमीच्या शर्यतीसाठी एकूण ९ चेक पॉईंट तयार करण्यात आले आहेत. त्यातील चेकपॉईंट क्र. २ आणि तीनच्या दरम्यान हा अपघात झाला.  चिनी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संपूर्ण स्पर्धेत हा भाग धोकादायक समजला जातो. यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना वाळू आणि कड्यांमध्ये असलेल्या तीव्र उतारांवरून जावे लागते. खराब हवामानामुळे येथील परिस्थिती अधिकच प्रतिकूल बनली होती. प्रतिकूल हवामान पाहून अनेक धावपटूंनी स्पर्धा सोडली. तर अनेकजण असेही होते जे निर्मनुष्य ठिकाणी एकटे अडकले. वेगाने वाहणाऱ्या हवेने त्यांच्याकडील थर्मल चादरी फाडून टाकल्या त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान घसरले. 

तसेच या मॅरेथॉनशी संबंधित चीनच्या अधिकाऱ्यांच्या बेफिकीरीने शर्यतीत सहभागी झालेल्या धावपटूंचा जीव घेतला. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी स्पर्धक आणि आयोजकांना हवामानाबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही. धावकांना देण्यात आलेल्या किटमधील थर्मल चादरी ह्या खूप लहान होत्या. एवढेच नाही तर ट्रेक धोकादायक असल्याचे माहिती असूनही आपातकालीन परिस्थितीची सामना करण्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.  

टॅग्स :chinaचीनMarathonमॅरेथॉनAccidentअपघात