स्टॉकहोम : यंदाच्या वर्षी नोबेल पुरस्कारांची रक्कम ७४ लाख रुपयांवरून ८ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. स्वीडिश चलन क्रोनरच्या मूल्यात घसरण झाल्याने नोबेल फाउंडेशनने हा निर्णय घेतला. स्वीडनच्या क्रोनर या चलनाचे मूल्य युरो व अमेरिकी डॉलरच्या तुलनेत कधी नव्हे इतक्या खालच्या स्तरावर झपाट्याने घसरले आहे. त्यावेळी प्रत्येक गटातील विजेत्याला दीड लाख क्रोनरची रोख रक्कम पुरस्काराबरोबर दिली जात असे. गेल्या पंधरा वर्षांत नोबेल पुरस्काराच्या रकमेत काही वेळा बदल करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
नोबेल पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 9:14 AM