मागील वर्षी जुलैमध्ये बांगलादेशात झालेल्या उठावाचे प्रमुख नेते आणि इन्कलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांचे गुरुवारी रात्री सिंगापूरमधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या आठवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात गोळी झाडून हादी गंभीर जखमी झाले होते.
मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी राष्ट्राला उद्देशून बोलताना म्हटले की, "आज मी तुम्हाला खूप दुःखद बातमी घेऊन येत आहे. जुलैमध्ये झालेल्या उठावाचे निर्भय आघाडीचे सैनिक आणि इन्कलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी आता आपल्यात नाहीत."
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
युनूस यांनी हादी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले आणि एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला. हादी यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने सिंगापूरमध्ये शस्त्रक्रियेला मान्यता दिल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला.
निदर्शकांनी हत्येचा निषेध केला
हादी यांच्या मृत्यूची बातमी पसरताच, निदर्शक शाहबागमध्ये जमले आणि वाहतूक रोखली, त्यांनी हादीला न्याय मिळावा अशी मागणी करत घोषणाबाजी केली. निदर्शनादरम्यान, निदर्शकांनी हत्येचा निषेध करत आणि अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करत घोषणाबाजी केली.
दरम्यान, राष्ट्रीय छात्र शक्तीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षक-विद्यार्थी केंद्रपासून एक वेगळी मिरवणूक काढली आणि कॅम्पसच्या विविध भागातून पुढे निघाली.
अवामी लीगच्या पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड
राजशाही विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मोठा निषेध मोर्चा काढल्यानंतर राजशाही शहरात तणाव निर्माण झाला. विद्यापीठ कॅम्पसपासून सुरू झालेले हे निदर्शने अखेर शहराच्या मध्यभागी गेली, तिथे आता बंदी घातलेल्या अवामी लीगच्या पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
Web Summary : Rebel leader Sharif Usman Hadi's death in Singapore sparked widespread protests in Bangladesh. Demonstrators blocked roads, demanding justice. Violence escalated, with Awami League office vandalized. National mourning declared; probe ordered.
Web Summary : सिंगापुर में विद्रोही नेता शरीफ उस्मान हादी की मौत के बाद बांग्लादेश में व्यापक विरोध प्रदर्शन हुए। प्रदर्शनकारियों ने सड़कों को अवरुद्ध कर दिया, न्याय की मांग की। हिंसा भड़क गई, अवामी लीग कार्यालय में तोड़फोड़ की गई। राष्ट्रीय शोक घोषित; जांच के आदेश दिए गए।