शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईदचा खात्मा? पाकिस्तान हादरला, पुतण्याचा गोळीबारात मृत्यू; जखमी बड्या नेत्याची ओळख लपविली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 08:03 IST

Hafiz Saeed Latest News: लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ नेता फैसल नदीम उर्फ ​​अबू कताल याचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक मोठी घटना घडली आहे. २६/११ चा मास्टरमाईंड लष्कर-ए-तोयबाचा हाफिज सईद आणि त्याचा साथीदारावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात हाफिज सईद मारला गेला असल्याचा दावा केला जात आहे. तसेच लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ नेता फैसल नदीम उर्फ ​​अबू कताल याचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

झेलममधील मंगला बायपासजवळ मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. अबू कताल हा सईदचा पुतण्या आहे, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जमात-उद-दावाचा एक बडा नेताही यात जखमी झाला असून त्याची ओळख लपवून ठेवण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी हँडलनी केला आहे. 

प्राथमिक माहितीनुसार कताल याचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर बडा नेता जखमी झाला होता. त्याला वाचविण्यात अपयश आल्याचे सांगितले जात आहे. सईदच्या मृत्यूची पुष्टी झालेली नाही. काहींनी सईद कराचीमध्ये असल्याचे म्हटले आहे. झेलममध्ये पोलिसांनी गस्त वाढविली असून मुख्य हॉस्पिटलला ये-जा करण्यापासून लोकांना रोखले जात आहे. 

हल्ल्यानंतर या बड्या नेत्याला एका अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. यामुळे तो हाफिज सईद होता, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. काही पाकिस्तानी मीडिया दुसरा मारला गेलेला जमात उद दावाचा नेता जफर इक्बाल आहे, असे सांगत आहेत. 

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कतालने ९ जून रोजी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोरी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी