शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

तीन मिनिटांत Zoom कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ; आता टीकेनंतर मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 11:29 IST

Better.com चे सीईओ आणि संस्थापक विशाल गर्ग यांनी एका Zoom कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना दिला होता नारळ.

Better.com चे सीईओ आणि संस्थापक विशाल गर्ग यांनी एका Zoom कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. तसंच याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. यानंतर विशाल गर्ग यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या केलेल्या कपातीसाठी बाजार, प्रॉडक्टिव्हिटी आणि प्रॉडक्शन कारणीभूत असल्याचे विशाल गर्ग यांनी सांगितलं होतं. परंतु त्यांच्या वक्तव्यावरून झालेल्या टीकेनंतर आता त्यांनी माफी मागितली आहे.दरम्यान गर्ग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक माफीच ईमेल केला आहे. यामध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं या निर्णयाची घोषणा केल्याचं म्हटलं. हा इमेल बेटर डॉट कॉमच्या एका कर्मचाऱ्यानं लिक केला आहे. “निर्णयामुळे प्रभावित झालेल्या लोकांप्रती आणि त्यांच्या योगदानाबद्दल आपण योग्य प्रकारे आदर आणि कौतुक व्यक्त करू शकलो नाही. कर्मचारी कपात करण्याचा निर्णय आपलाच होता, पण तो जाहीर करण्याच्या पद्धतीत आपली चूक झाली,” असं त्यांनी म्हटलं आहे. मी त्यांना ज्याप्रकारे या कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं, त्यामुळे स्थिती अजून बिकट झाली आहे. मला मनापासून माफ करा,” असंही ते म्हणाले.कोण आहेत गर्ग?विशाल गर्ग हे बेटर.कॉम कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. ही कंपनी एक डिजिटल फर्स्ट होम ओनरशिप कंपनी आहे. गर्ग यांच्या लिंक्डइनवरील बायोडाटानुसार ते एक गुंतवणूक कंपनी वन झीरो कॅपिटलचे संस्थापक पार्टनरही आहेत. दरम्यान, विशाल गर्ग हे या वर्षाच्या सुरवातीला कोरोनाच्या साथी दरम्यान न्यूयॉर्कमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधेसाठी १५ कोटी रुपयांची मदत केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या पैशांचा वापर गरीब मुलांसाठी आयपॅड, इंटरनेट, पुस्तके, ड्रेससारख्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी करण्यात आला होता.जर तुम्ही या कॉलमध्ये असाल तर तुम्ही या दुर्दैवी ग्रुपचा एक भाग आहात, या झूम कॉलमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जात आहे, असं सांगत विशाल गर्ग यांनी ९०० कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. दरम्यान, कंपनीने घेतलेल्या या कठोर निर्णयावर अनेकांकडून टीकाही करण्यात आली होती.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयjobनोकरी