शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:37 IST

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही नोट ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करण्यापूर्वी वेस्टर्न वॉलवर सोडली होती. तर जाणून घेऊयात काय आहे याचा अर्थ...?

इस्रायलनेइराणची राजधानी असलेल्या तेहरानसह अनेक ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवले आहेत. या हल्ल्याने इराण जबरदस्त हादरला आहे. इस्रायली ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे संपूर्ण इराणमध्ये हाहाकार निर्माण झाला आहे. इस्रायलने इराणच्या लष्करी आणि अण्विक ठिकानांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक 'नोट' व्हायरल होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही नोट ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करण्यापूर्वी वेस्टर्न वॉलवर सोडली होती. तर जाणून घेऊयात काय आहे याचा अर्थ...?

नेतन्याहू यांनी सोडलेले पत्र - ऑपरेशन रायझिंग लायन सुरू होण्यापूर्वी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वेस्टर्न वॉलवर एक लेटर सोडले होते. यात लिहिले आहे "एक असे राष्ट्र, जे सिंहिनीप्रमाणे उठते आणि सिंहाप्रमाणे स्वतःला उर उचलते." तर जाणून घेऊयात, काय आहे वेस्टर्न वॉल आणि येथे का ठेवली जाते नोट...?

काय आहे 'वेस्टर्न वॉल?' -वेस्टर्न वॉलला वेलिंग वॉल किंवा कोटेल असेही म्हटले जाते. हे ज्यूंचे धार्मिक स्थळ आहे. जे जुन्या जेरुसलेममध्ये आहे. धार्मिक दृष्टिने ही भिंत ज्यूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लोक येथे प्रार्थना करत असतात. येथे शतकानुशतके नोट ठेवण्याची अथवा सोडण्याची परंपरा चालू आहे. येथे केलेल्या प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचतात, असा लोकांचा विश्वास आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ल्याच्या एक दिवस आधी येथे नोट सोडली होती.

आण्विक केंद्र अन् लष्करी छावण्यांवर इस्रायलने डागली क्षेपणास्त्रे -वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इस्रायलने शुक्रवारी (१३ जून) इराणमधील आण्विक केंद्र आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत अंदाधुंद हल्ले केले. इस्रायलच्या मिसाईल हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान झाले असून, लष्करी अधिकारीही मारले गेले आहेत. इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनमध्ये रिव्होल्युशनरी गार्डसचे प्रमुख म्हणजे इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार झाले आहेत. त्याचबरोबर इराणच्या लष्कराचे काही वरिष्ठ अधिकारीही मारले गेले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे दोन अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत

टॅग्स :Israelइस्रायलBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIranइराण