शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Benjamin Netanyahu: मोदींचा मित्र जिंकला! नेतन्याहू पुन्हा इस्त्रायलचे पंतप्रधान बनले; गाझा पट्टीने चार रॉकेट डागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 09:02 IST

नेतन्याहू यांचे पुन्हा पंतप्रधान बनने भारतासाठी फायद्यासाठी आहे. भारत आणि इस्त्रायलमधील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत.

येरुशलेम: इस्त्रायलमध्ये पुन्हा बेंजामिन नेतन्याहू यांची सत्ता आली आहे. या देशात एवढी अस्थिरता आहे की गेल्या पाच वर्षांत चारवेळा निवडणुका झाल्या आहेत. परंतू, कोणालाच स्पष्ट बहुमत मिळत नसल्याने काही महिन्यांनी पुन्हा निवडणूक घ्यावी लागत होती. यावेळी नेतन्याहू यांनी मोठा विजय मिळविला आहे. 

नेतन्याहू यांचे पुन्हा पंतप्रधान बनने भारतासाठी फायद्यासाठी आहे. भारत आणि इस्त्रायलमधील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. २०२१ पर्यंत नेतन्याहू सत्तेत होते. नेतन्याहूंचा विजय झाल्याचे समजताच गाझा पट्टीकडून इस्त्रायलवर चार मिसाईल डागण्यात आली. यामध्ये नुकसानीची माहिती समोर आलेली नसली तरी एक एक तासाच्या अंतराने ही चार मिसाईल डागल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. 

फिलिस्तीनी जिहादींनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी गाझा सीमेजवळील किसुफिम, ऐन हशलोशा आणि नीरिम या शहरांना रॉकेट सायरनने सतर्क केले. आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टमद्वारे रॉकेट हल्ले रोखण्यात आले. नेतन्याहू यांच्या पक्षाला जवळपास ६४ जागांसाठी बहुमत मिळाले आहे. १२० जागांसाठी ही निवडणूक झाली. सत्तेत येण्यासाठी ६१ जागांची आवश्यकता असते. अद्याप काही मते मोजायची होती. परंतू चार जागांसाठी विरोधकांना एकूण मतांपैकी ३.२५ मते मिळण्याची शक्यता कमी होती. यामुळे नेतन्याहू यांच्या आघाडीकडे सत्तेत जाण्याएवढी आघाडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

निवडणूक प्रक्रिया...इस्रायलमधील लोक कधीही कोणत्याही उमेदवाराला मत देत नाहीत, तर ते पक्षाला मतदान करतात. जर संसदेत खासदार हवा असेल तर एका जागेसाठी पक्षाला राष्ट्रीय मताच्या किमान 3.25% मते मिळावी लागतात. त्याच्या गुणोत्तरामध्ये खासदारांची संख्या वाढविता येते. इस्त्रायलमध्ये प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन असलेली निवडणूक प्रक्रिया आहे. पक्षाला मिळणाऱ्या मतांच्या संख्येनुसार जागा मिळतात. 

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायल