जेरुसलेम : इस्रायलच्या संसदीय निवडणुकीची ९१ टक्के मतमोजणी पूर्ण झाली असून माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील गटाने १२० सदस्यांच्या संसदेत ६५ जागांसह बहुमत मिळविले आहे. त्यामुळे त्यांचा पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाला ३२, पंतप्रधान यायर लॅपिड यांच्या येश अतिदला २४, धार्मिक झिओनिझमला १४ मते मिळण्याचा अंदाज आहे.
इस्रायलच्या पंतप्रधानपदी पुन्हा बेंजामिन नेतान्याहू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 06:12 IST