शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रकमेच्या अपहारप्रकरणी बेगम खालिदा झिया यांना पाच वर्षांचा तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 03:53 IST

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) या विरोधी पक्षाच्या प्रमुख बेगम खालिदा झिया यांना विशेष न्यायालयाने भ्रष्टाचाराबद्दल पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) या विरोधी पक्षाच्या प्रमुख बेगम खालिदा झिया यांना विशेष न्यायालयाने भ्रष्टाचाराबद्दल पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यांना श्क्षिा ठोठावली जाताच, त्यांचे न्यायालयात आलेले नातेवाईक व कार्यकर्ते तिथेच रडू लागले. त्यावर ‘तुम्ही अजिबात रडू नका, मी लवकरच बाहेर येईन’, असे खालिदा झिया यांनी त्यांना सांगितले.झिया आॅर्फनेज ट्रस्ट आणि झिया चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांच्या नावे परदेशांतून मिळालेल्या २१ दशलक्ष टका (सुमारे २.५२ लाख डॉलर) देणग्यांच्या रकमांचा खासगी वापरासाठी अपहार केल्याच्या आरोपावरून ७२ वर्षांच्या बेगम झियांना ही शिक्षा ठोठावली. झिया यांचा मुलगा तारिक व इतर चौघांना याच खटल्यात प्रत्येकी १० वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात जाऊ , असे बेगम झिया यांच्या वकिलांनी निकालानंतर सांगितले.२००१-२००६ या काळात बेगम झिया यांच्या नेतृत्वाखाली ‘बीएनपी’चे सरकार सत्तेवर असताना या दोन स्वयंसेवी संस्था केवळ कागदावर स्थापन केल्या गेल्या व त्यांच्या देणग्यांचा अपहार केला गेला, या आरोपावरून भ्रष्टाचार विरोधी आयोगाने हा खटला दाखल केला होता. हा खटला रद्द केला जावा यासाठी बेगम झिया यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयात दोनदा याचिका केल्या होत्या. परंतु त्या फेटाळल्या गेल्या होत्या. (वृत्तसंस्था)>पोलीस-समर्थकांमध्ये झटापटबेगल खालिदा झिया यांच्या खटल्याचा निकाल लागणार असल्याने त्यांच्या बांग्लादेश नॅशनल पार्टीचे हजारो कार्यकर्ते सकाळपासून ढाका शहरात जमू लागले होते.त्यामुळे ढाक्यात तणाव निर्माण झाला होता.त्यांनी आंदोलन करू नये आणि शहरात वा देशात हिेंसाचार होऊ नये, यासाठी सर्वत्र पोलीस व सुरक्षा दलाचे जवान यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.काही ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान व बाग्लादेश नॅशनल पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली तसेच काही भागांत दगडफेकीचे प्रकारही घडले. ढाका शहरात व देशाच्या काही भागांत तणाव आहे.>कोर्टाचा निर्णय ऐकून रडणारे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना खालिदा झिया म्हणाल्या, ‘तुम्ही अजिबात रडू नका, मी लवकरच बाहेर येईन’!