शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एकटे नाही, मिळून लढू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 18:12 IST

आफ्रिका खंड मागास म्हणून ओळखला जातो, अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भीषण संघर्ष आहे, पण कोरानानं त्यांनाही आपला संघर्ष तात्पुरता का होईना, मिटवायला भाग पाडलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रo्नावर एकत्र येताहेत आणि जनतेच्या भल्यासाठी काही करू पाहताहेत. 

ठळक मुद्देकोरोनामुळे जानी दुष्मनीही बदलली दोस्तीत.

- लोकमत‘आता काय होईल आपलं?’, या भीतीची छाया संपूर्ण जगावर पसरलेली आहे. प्रत्येक जण घाबरलेला आहे आणि या काळात प्रत्येकाला सक्तीनं एकमेकांपासून दूर राहावं लागत असलं, तरी अनेक जण एका मानसिक पातळीवर एकत्रही येत आहेत. कोरोनाच्या या संकटाचा मुकाबला करायचा, तर एकट्यानं लढून फायदा नाही, दुसर्‍याची साथ आपल्याला हवीच, ही भावनाही अनेकांच्या मनात आकार घेते आहे. त्यामुळेच जगभरातील नेतेही आपापसातले मतभेद दूर ठेऊन एकत्रितपणे यावर उपाय शोधण्याचा प्रय} करताहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आफ्रिका खंडातील देश. हा संपूर्ण खंडच मागास म्हणून ओळखला जातो, अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भीषण संघर्ष आहे, पण कोरानानं त्यांनाही आपला संघर्ष तात्पुरता का होईना, मिटवायला भाग पाडलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रo्नावर एकत्र येताहेत आणि जनतेच्या भल्यासाठी काही करू पाहताहेत. युगांडात प्रचंड लाकप्रिय असलेला बॉबी वाइन हा पॉपस्टार. सरकारचा तो प्रखर विरोधक आणि राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धीही आहे. आपल्या पॉप म्युझिकमुळे बॉबी युगांडात, विशेषत: तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचं मूळ नाव रॉबर्ट क्यागुलयानी सेंटामू, पण म्युझिकसाठी त्यानं बॉबी वाइन हे नाव धारण केलं आहे. कोरोनाच्या काळात सरकार आणि जनतेला मदत म्हणून त्यानं नुकताच एक म्युझिक व्हिडीओ तयार केला आहे. खरंतर कोरोनाचा प्रतिकार कसा करायचा, यासंबंधीचं हे साधंसुधं गाणं, पण त्याचा ठेकाच इतका आकर्षक आहे, की युगांडामध्ये ते अल्पावधीत प्रचंड पॉप्युलर झालं. प्रत्येकाच्या तोंडी सध्या हेच गाणं आहे. ‘कोरोना व्हायरस संपूर्ण मानवजातीलाच नष्ट करायला निघाला असताना आपण सर्वांनी  काळजी घेणं गरजेचं आहे’ या अर्थाचा त्याच्या गाण्याचा मुखडा. बॉबी म्हणतो, या गाण्याचा मुखडा म्युझिकवर म्हणत तुम्ही फक्त साबणानं हात धुवा. तेवढय़ा काळात बरोब्बर वीस सेकंद झालेले असतील! लोकांनी बॉबीचा हा सल्ला अक्षरश: मनावर घेतल्यानं हजारो लोक आता हे गाणं म्हणता म्हणता साबणानं हात धुवत आहेत. https://youtu.be/PUHrck2g7Ic यूट्यूबच्या या लिंकवर हे अफलातून गाणं तुम्हालाही ऐकता येईल आणि त्यावर तुम्हीही नक्कीच ठेका धराल.युगांडाप्रमाणेच केनियातील ऐतिहासिक विरोधी पक्षनेता रैला ओडिंगा यांनीही आपला व्हिडीओ ऑनलाइन प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, कोरोनामुळे संपूर्ण मानवजातीलाच धोका आहे. त्यापासून जपा. दक्षिण आफ्रिकेत राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांना त्यांचे  प्रमुख विरोधक ज्युलिअस मालेमा यांनीही साथ देताना  लोकांना आवाहन केलं आहे, की सरकारचं ऐका. घरातून बाहेर पडू नका. पारंपरिक दुष्मनी ही सध्या अशी दोस्तीत बदलली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या