Bird Flue : सध्या सगळीकडेच बर्ड फ्लूचे प्रमाण वाढले आहे. नांदेडसह अन्य परिसरात बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. कॅलिफोर्नियामध्ये एक नवीन स्ट्रेन आढळला आहे.हा स्ट्रेन एका बदक फार्ममध्ये आढळून आला आहे. शास्त्रज्ञांनी या स्ट्रेनला H5N9 असे नाव दिले आहे.
महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही जीबीएसचा प्रादुर्भाव, तिघांचा मृत्यू
वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन फॉर ॲनिमल हेल्थने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत असा स्ट्रेन पहिल्यांदा आढळला आहे. यामुळे आता चिंता व्यक्त केली आहे. या नवीन स्ट्रेनमुळे पक्षांना बर्ड फ्लू मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. या नवीन स्ट्रेनमुळे आता त्या फॉर्ममध्ये पक्षांना क्वारंटाईन करुन स्क्रीनिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सध्या बर्ड फ्लू दोन प्रकारांमध्ये आहे. पहिला म्हणजे न्यूरामिनिडेस (N1 किंवा N9) आणि दुसरा हेमॅग्लुटिनिन (H5 किंवा H3). हे दोन्ही विषाणू वेगाने पसरु शकतात.
बर्ड फ्लूचा कॉमन प्रकार H5N1 स्ट्रेनची दोन प्रकरणे समोर आली आहेत. या स्ट्रेनचे रुग्ण फक्त प्राणी आणि पक्ष्यांमध्येच नाही तर मानवांमध्येही आढळत आहेत. आतापर्यंत अमेरिकेत मानवांमध्ये बर्ड फ्लूची सुमारे ६७ प्रकरणे समोर आली आहेत.
बर्ड फ्लूची लक्षणे
पक्ष्यांमध्ये-
- अचानक मृत्यू- पंख पडणे -डोके आणि मानेची हालचाल- चालण्यात अडचण-अंडी उत्पादन कमी होणे
मानवांमधील लक्षणे
-ताप
-खोकला
-घसा खवखवणे
-स्नायू दुखणे
-डोकेदुखी
-थकवा
-श्वास घेण्यात अडचण
बर्ड फ्लूचा धोका फक्त पक्षी आणि प्राण्यांसाठीच नाही तर मानवांसाठीही आहे. मानवांमध्ये संसर्गाचा धोका कमी असला तरी, संक्रमित पक्षी किंवा प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना संसर्गाचा धोका जास्त असतो.