वॉशिंग्टन : कॅलिफोर्निया गोळीबाराच्या घटनेनंतर मुस्लिम समुदायाला लक्ष्य करून राजकीय शेरेबाजी करण्यात येत असल्यामुळे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा दुखावले आहेत. देशभक्त मुस्लिम समाजाला एकटे पाडण्याच्या कोणत्याही प्रयत्नाने इस्लामिक स्टेट आणि अल-काईदासारख्या दहशतवादी संघटनांचे दावे खरे ठरण्यास मदत होईल, असे व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जोश अर्नेस्ट म्हणाले. त्यामुळे कोणा एकाच्या चुकीसाठी सर्वांना दोषी ठरवणे बरोबर नाही, अशी ओबामांची भावना आहे, असेही ते म्हणाले.
शेरेबाजीने बराक ओबामा दुखावले
By admin | Updated: December 6, 2015 03:25 IST