शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बँक ऑफ जपानकडून वृद्धिदर घटण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 08:53 IST

जपानी अर्थव्यवस्थेतील सुधारणा धोक्यात येण्याची भीती आहे.

टोकियो : पुढे आणखी मोठे संकट आहे, असा इशारा बँक ऑफ जपानने जपानी अर्थव्यवस्थेसाठी जारी केला आहे. अमेरिकी टॅरिफनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्त्वपूर्ण आहे. 

विश्लेषकांच्या मते, अमेरिकी करांमुळे जपानचा अर्थिक वृद्धीचा दर ०.८ टक्क्यांपर्यंत घटू शकते. बँकेने जारी केलेल्या निवेदनात अमेरिकी टॅरिफचा स्पष्टपणे उल्लेख मात्र केलेला नाही. बँकेने म्हटले की, काही कंपन्यांचे उत्पादन व नफा याबाबत चिंता करण्याजोगी स्थिती आहे. जपानी अर्थव्यवस्थेसाठी अनिश्चितता वाढत आहे. जपानी अर्थव्यवस्थेतील सुधारणा धोक्यात येण्याची भीती आहे. बँक ऑफ जपानने आपल्या सर्व ९ क्षेत्रांसदर्भात म्हटले की, अर्थव्यवस्था एक तर सुधारत आहे किंवा मध्यम गतीने वाढत आहे.

खर्च ग्राहकांच्या माथीबँक ऑफ जपानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा अहवाल अमेरिकेच्या समतूल्य आयात कराचा परिणाम पूर्णांशाने दर्शविणारा नाही. विदेशी पर्यटकांच्या मजबूत खरेदीमुळे तसेच चैनीच्या वस्तूंच्या वाढलेल्या मागणीमुळे विक्रीला बळ मिळाले आहे. कंपन्या कॅपेक्स करण्यास तयार आहेत. अनेक क्षेत्रांत वेतन वृद्धी होत आहे. काही छोटे व्यवसाय वेतन वाढीबाबत सतर्क आहेत. कंपन्या हळूहळू आयात खर्च ग्राहकांच्या माथी मारत आहेत. काही तर किमती वाढविण्याच्या योजनाही बनवत आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा जगभरातील क्रिप्टो चलनांना मोठा फटका बसला आहे.  बाजार भांडवलाच्या दृष्टीने जगात मोठे असलेले क्रिप्टो चलन बिटकॉईन उच्चांकापासून २९ टक्के घसरून ७७ हजार डॉलरवर आले आहे.अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी क्रिप्टो चलनास समर्थन दिले होते. ते राष्ट्रपती होताच बिटकॉईन प्रचंड तेजीत येऊन १ लाख डॉलरच्या वर गेले होते. आता टॅरिफ धोरणामुळे बिटकॉईन आपटले आहे. नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत बिटकॉईन रॉकेटच्या गतीने वाढले होते. 

पाकिस्तानचा शेअर बाजार ८ हजार अंकांनी कोसळला

कराची : मंदीच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारांत घसरण होत असताना पाकिस्तानही त्यातून सुटला नाही. पाकिस्तानचा शेअर बाजार पीएसएक्समध्ये सोमवारी ८ हजार अंकांची मोठी घसरण झाली होती. त्यामुळे बाजारातील व्यवहार तासाभरासाठी थांबविण्यात आले होते. आर्थिक विश्लेषकांनी या तीव्र घसरणीसाठी जागतिक मंदीच्या भीतीला जबाबदार धरले. 

टॅग्स :businessव्यवसायEconomyअर्थव्यवस्था