शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात शेख हसीना यांची चौथ्यांदा येणार सत्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 06:01 IST

बांगलादेशाच्या ११ व्या संसदेसाठी रविवारी झालेल्या रक्तरंजित मतदानानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे सरकार सलग चौथ्यांदा सत्तेवर येण्याची चिन्हे मतमोजणीच्या प्राथमिक रोखावरून दिसत आहेत.

ढाका : बांगलादेशाच्या ११ व्या संसदेसाठी रविवारी झालेल्या रक्तरंजित मतदानानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे सरकार सलग चौथ्यांदा सत्तेवर येण्याची चिन्हे मतमोजणीच्या प्राथमिक रोखावरून दिसत आहेत. मतदानाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात १९ जणांचा मृत्यू झाला, तर पन्नासहून अधिक जखमी झाले. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या प्रमुख विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर मतदानात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत निवडणुकीचे निकाल अमान्य केले आहेत.एका मतदारसंघातील उमेदवाराचे निधन झाल्याने ३०० पैकी २९९ जागांसाठी मतदान झाले. सायंकाळी मतदान संपताच मतमोजणीस सुरुवात झाली. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृत्त देईपर्यंत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगला ९० जागा, त्यांच्या सहयोगी पक्षाला १३ जागा, तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला ३ जागा मिळाल्या आहेत. हाच रोख कायम राहिला, तर त्यांचे सरकार पूर्वीपेक्षा मोठ्या बहुमताने पुन्हा सत्तेवर येईल, अशी शक्यता दिसते. स्वत: शेख हसीना यांनीही मतदान केल्यानंतर देशातील लोकांना विकास हवा असल्याने ते पुन्हा आम्हालाच निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला.निवडणुकीच्या प्रचारातही मोठा हिंसाचार होऊन वातावरण विखारी झालेच होते. तीच तेढ मतदानाच्या वेळीही कायम राहिली. अनेक ठिकाणी अवामी लीग व ‘बीएनपी’च्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक चकमकी झाल्या. दिवसभरात मरण पावलेल्या १९ जणांपैकी ८ अवामी लीगचे, तर ११ ‘बीएनपी’चे समर्थक असल्याचे समजते. स्वत: खालिदा झिया यांच्यावर निवडणूकबंदी असल्याने त्या निवडणूक रिंगणात नव्हत्या; परंतु पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील व बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांचे ज्येष्ठ सहकारी व विख्यात कायदेतज्ज्ञ कमाल होसेन यांनी सुमारे ४० वर्षांचा राजकारण संन्यास सोडून शेख हसीना यांच्या ‘भ्रष्ट’ सरकारपासून देशाला मुक्ती देण्यासाठी दंड थोपटलेआहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Bangladeshबांगलादेश