शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश होणार मालामाल, आधी अमेरिका मग जागतिक बँक देणार २ अब्ज डॉलर्सची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:39 IST

बांगलादेशला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जागतिक बँक बांगलादेशला २ अब्ज अमेरिकी मदत देणार आहे.

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशची परिस्थिती बिघडली आहे. आता बांगलादेशात सत्तांत्तर झाले आहे. दरम्यान, आता बांगलादेशासाठी जागतिक बँकेने मदतीची घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्षात बांगलादेशला २ अब्ज अमेरिकी डॉलर रक्कम देणार असल्याचे जागतिक बँकेने सांगितले. ही रक्कम बांगलादेशला महत्त्वाच्या सुधारणा, पूरस्थिती हाताळणे, हवेचा दर्जा चांगला यांसाठी देण्यात येणार आहे. मजबूत विकासासाठी आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा दिल्या जातील.

जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान

जागतिक बँकेचे प्रादेशिक संचालक अब्दुलाये सेक यांनी मंगळवारी ढाका येथे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्याशी झालेल्या बैठकीत नवीन मदत देण्याचे आश्वासन दिले. "अंतरिम सरकारच्या सुधारणेच्या अजेंड्याला पाठिंबा देण्यासाठी जागतिक बँक चालू आर्थिक वर्षात बांगलादेशला दिलेले कर्ज वाढवणाप आहे आहे,असंही अब्दुलाये सेक म्हणाले.

मुख्य सल्लागारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. मोहम्मद युनूस यांनी ट्विटरवर लिहिले, "SEC नुसार, गंभीर सुधारणा, सुधारित हवा गुणवत्ता आणि आरोग्य सेवेवर काम करण्यासाठी जागतिक बँक चालू आर्थिक वर्षात अंदाजे २ अब्ज अतिरिक्त सहाय्य प्रदान करेल.

यापूर्वी अमेरिकेने बांगलादेशला २०० दशलक्ष डॉलर्सची मदतही दिली होती. बांगलादेशी अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा पैसा युवकांच्या कल्याणासाठी, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि व्यवसायाच्या संधी वाढवण्यासाठी वापरला जाईल. बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असताना, पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले, त्यानंतर बांगलादेशातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बिघडली. आंदोलकांनी पंतप्रधानांचे निवासस्थान आणि संसदेसह अनेक ठिकाणी तोडफोड केली. परिस्थिती चिघळल्याने हिंदू समाजावर अत्याचार होऊ लागले. देशातील अनेक प्रमुख हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करून जाळण्यात आली.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश