शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश पुन्हा पेटले; १०० ठार, एकाच पोलीस ठाण्याच्या १३ पोलिसांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 07:48 IST

Bangladesh Riots, Protest : पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पेटला वाद; इंटरनेट बंद

ढाका: पंतप्रधान शेख हसीना राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या निदर्शनानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला.. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात १४ पोलिसांसह १०० पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला असून ४०पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हिंसाचारावर नियंत्रणासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली असून, ३ दिवस सुट्टी जाहीर केली आहे. आंदोलकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला, त्याच १३ पोलिसांचा मृत्यू झाला.

शेख हसीना जानेवारी २०२४मध्ये पंतप्रधानपदी निवडून आल्या. मात्र, या निवडणुकीवर विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलीस्ट पार्टीने (बीएनपी) बहिष्कार टाकला होता. रविवारी बीएनपीच्या कार्यकर्त्यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. त्यांचा अवामी लीग, विद्यार्थी लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध केला. त्यातून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष पेटला. आंदोलकांनी प्रमुख रस्ते रोखल्यानंतर राजधानी ढाक्यासह इतर शहरांमध्येही संघर्ष पेटला.

लष्कर मागे घ्या : माजी लष्करी अधिकाऱ्यांची मागणीहिंसाचार रोखण्यासाठी शेख हसीना यांनी लष्कराला पाचारण केले आहे. मात्र, त्यांना रस्त्यांवरून मागे घ्या आणि बराकीमध्ये परत पाठवा, अशी मागणी माजी लष्करी अधिकाऱ्याऱ्यांनी केली आहे.

अशा प्रकारची निदर्शने रोखण्यासाठी लष्कराची शक्त्ती वाया घालवू नका, असे या अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. बांगलादेशच्या लष्कराने कधीही आपल्याच नागरिकांवर बंदु‌का रोखल्या नाहीत आणि त्यांना असे प्रशिक्षणही दिलेले नाही, असे माजी लष्करप्रमुख इकबाल भुयान म्हणाले.

यापूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भडकला होता हिंसाचारकाही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी हिंसा भडकली होती. त्यात २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. शेकडो भारतीय विद्यार्थी तेथून भारतात परतले होते. सरकारने विविध श्रेणीतील ५६ टक्के आरक्षण रद्द केले होते. हा निर्णय तेथील सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला होता.

पुन्हा उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशातील भारतीय नागरिकांना उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्कात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी उच्चायुक्त कार्यालयाने एक संपर्क क्रमांक जारी केला आहे.

विद्यापीठात जाळपोळबंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय विद्यापीठात काही अज्ञात लोकांनी अनेक वाहनांची जाळपोळ केली. रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांची तोडफोडदेखील करण्यात आली. १३ जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला आहे. सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप. मेसेंजर यासह सर्व सोशल मीडियावर तत्काळ बंदी घातली आहे.

ते दहशतवादी : पीएममोबाइल सेवादेखील सरकारने खंडित केली आहे. शेख हसीना यांनी हिंसाचारानंतर सुरक्षेसंदर्भात बैठक बोलाविली. त्यात तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, पोलीस तसेच इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. आंदोलन करणारे विद्यार्थी नसून दहशतवादी आहेत, असे हसीना म्हणाल्या.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश