बांगलादेशची परिस्थितीती दिवसेंदिवस बिघडताना दिसत आहे. पंतप्रधान शेख हसीना पदच्युत झाल्यानंतर, नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारची धुरा आपल्या हाती घेतली. त्यांनी देशात सुधार आणण्यासंदर्भात आणि स्थिरता आणण्याचे आश्वास दिले होते. मात्र त्यांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक, विशेषतः हुंदूंवरील अत्याचार कमी झाले नाही. आता बांगलादेशातूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे. ही मागणी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) एक वरिष्ठ नेत्याने केली आहे. खरे तर मोहम्मद यूनुस भारतासोबत पंगा घेण्याच्या विचारात होते. मात्र, आता तेथील नेतेमंडळीच त्यांच्या धोरणाचा विरोध करू लागले आहे.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) मोहम्मद युनूस यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी त्याच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बीएनपीचे सरचिटणीस फखरुल इस्लाम यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात की सरकारने निष्पक्षपणे काम करून, देशाला योग्य दिशेने नेणे अपेक्षित आहे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार निष्पक्ष राहण्यास अपयशी ठरले आहे, ज्यामुळे देशात अस्थिरता वाढली, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच, जर हे अंतरिम सरकार निष्पक्ष राहू शकत नसेल तर निवडणुकीच्या वेळी तटस्थ सरकारची आवश्यकता असेल, असेही फखरुल इस्लाम यांनी म्हटले आहे.
निवडणउकीची मागणी -फखरुल इस्लाम यांनी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला सुधारणा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची आणि बांगलादेशात निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, निवडणुकीच्या मदतीने स्थापन झालेले सरकारच देशातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू शकते आणि देशाला स्थिरतेकडे घेऊन जाऊ शकते. तसेच, निवडणुका लांबवल्याने इतर शक्तीही परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात, यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असेही इस्लाम यांनी म्हटले आहे.