Bangladesh News ( Marathi News ) : मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात बांगलादेशात शेख हसीना यांच्याविरोधात विद्यार्थी संघटनेने देशभरात आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे बांगलादेशात सत्तांत्तर झाले होते, आता विद्यार्थी संघटना राजकीय पक्ष काढण्याची तयारी करत आहे. शेख हसीना यांचे सरकार पाडण्यासाठी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या त्याच विद्यार्थी गटांनी नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून लॉबिंग केले होते. पण नवीन राजकीय पक्षात त्यांची काही भूमिका असेल की नाही यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे संकेत युनूस यांनी आधीच दिले आहेत.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान निधीचा हप्ता जमा झाला
शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेशी विद्यार्थी गट स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशनने आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्या प्रमुख नेत्या नाहिद इस्लाम सध्या अंतरिम सरकारचा भाग आहेत. पण लवकरच ते नवीन पक्षात संयोजक म्हणून सामील होतील अशी चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी गट बुधवारी एका कार्यक्रमात एक नवीन पक्ष सुरू करू शकतो.
शेख हसीना यांनी सत्ता गमावल्यानंतर, बांगलादेशमध्ये नवीन निवडणुकांबद्दल सतत अनिश्चितता आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार युनूस यांनी सांगितले की, २०२५ च्या अखेरीस देशात निवडणुका होण्याची शक्यता आहे. अनेक राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की तरुण विद्यार्थी नेत्यांनी स्थापन केलेला पक्ष देशाची राजकीय परिस्थिती बदलू शकतो.
बांगलादेशात नवीन पक्षाची चर्चा
बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात या नवीन पक्षाबद्दल चर्चा सुरू आहे. पण युनूस यांच्या कार्यालयाने किंवा नाहिद इस्लामने नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याच्या मुद्द्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. दशकाहून अधिक काळ सत्तेत असलेल्या शेख हसीना यांना बांगलादेशातून पळून जावे लागले. निदर्शकांनी त्यांच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसून तोडफोड केली. या निदर्शनानंतर बांगलादेशात राजकीय अशांतता पसरली आहे.