शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:07 IST

Bangladesh Mandir Attack: बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक आणि हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. अनेक मंदिरांची मोडतोड होत असून, हिंदूंवरही सातत्याने अत्याचार सुरू आहेत. आता बांगलादेशमधील चट्टोग्राम येथे हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन हंगमी सरकार सत्तेवर आल्यापासून बांगलादेशमध्येहिंदू अल्पसंख्याक आणि हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. अनेक मंदिरांची मोडतोड होत असून, हिंदूंवरही सातत्याने अत्याचार सुरू आहेत. आता बांगलादेशमधील चट्टोग्राम येथे हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बांगलादेशमधील चट्टोग्राम येथे शुक्रवारी घोषणाबाजी करणाऱ्या जमावाने तीन हिंदू मंदिरांना लक्ष्य केलं. इस्कॉनच्या एका माजी सदस्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चट्टोग्राममध्ये आंदोलन सुरू आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला हरिशचंद्र मुनसेफ लेनमध्ये दुपारी सुमारे २.३० च्या दरम्यान झाला. यादरम्यान शांतानेश्वरी मातृ मंदिर, शनिमंदिर आणि शांतनेश्वरी कालिबाडी मंदिर या मंदिरांना लक्ष्य करण्यात आले.

याबाबत मंदिरातील विश्वस्तांनी सांगितलं की, घोषबाजी करत असलेला शेकडोंचा जमाव मंदिरावर चाल करून आला. या जमावाने मंदिरावर दगड-विटांचा वर्षाव केला. त्यामध्ये शनी मंदिर आणि इतर दोन मंदिरांच्या दरवाजांचं नुकसान झालं. येथील पोलीस ठाण्याचे प्रमुख अब्दुल करीम यांनी हल्ल्याच्या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, हल्लेखोरांनी मंदिरांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिरांचं फारसं नुकसान झालं नसल्याचा दावा पोलिसांनी केला.

दरम्यान, शांतिनेश्वरी मुख्य मंदिर व्यवस्थापन समितीचे स्थायी सदस्य तपन दास यांनी सांगितले की, शुक्रवारची नमाज झाल्यानंतर शेकडो लोकांचा जमाव  मंदिराच्या दिशेने चाल करून आला. ते हिंदू विरोधी आणि इस्कॉनविरोधी घोषणाबाजी करू लागले.  आम्ही हल्लेखोरांना विरोध केला नाही. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तेव्हा आम्ही लष्कराला बोलावले. ते त्वरित आले. तसेच त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मदत केली. दुपार होण्यापूर्वीच मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र हल्लेखोर विनाकारण तिथे पोहोचले आणि हल्ला केला, असा दावाही त्यांनी केला. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूInternationalआंतरराष्ट्रीय