शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात निवडणुकांआधी खळबळ: हिंदू नेते आणि माजी मंत्री रमेश चंद्र सेन यांचा कोठडीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 21:19 IST

अवामी लीगचे ज्येष्ठ नेते, माजी जलसंपदा मंत्री आणि देशातील प्रमुख हिंदू चेहरा असलेले रमेश चंद्र सेन (८५) यांचा शनिवारी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला.

बांगलादेशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर एका मोठ्या राजकीय घटनेने खळबळ उडवून दिली आहे. अवामी लीगचे ज्येष्ठ नेते, माजी जलसंपदा मंत्री आणि देशातील प्रमुख हिंदू चेहरा असलेले रमेश चंद्र सेन (८५) यांचा शनिवारी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. ८५ वर्षीय सेन यांच्या मृत्यूमुळे मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर आणि जेल प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अवामी लीगच्या नेत्यांनी आणि सोशल मीडियावर नागरिकांनी ही 'कस्टोडियल किलिंग' असल्याचा आरोप केला आहे.

उपचारांत हलगर्जीपणाचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश चंद्र सेन हे अनेक दिवसांपासून गंभीर आजारांशी झुंजत होते. शनिवारी सकाळी ९:१० च्या सुमारास त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना दिनाजपुर जिल्हा कारागृहातून दिनाजपुर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर अवघ्या १९ मिनिटांत म्हणजे ९:२९ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ८५ वर्षांच्या माजी मंत्र्याला जेलमध्ये योग्य वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत, असा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.

अपमानास्पद वागणूक आणि अटकेचा तो काळ

ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर अवामी लीगच्या नेत्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू झाल्या. त्यावेळी अनेक नेते देश सोडून पळून गेले, पण रमेश चंद्र सेन आपल्या घरीच राहिले. "मी काहीही चुकीचे केले नाही, मग पळायचे कशाला?" असा त्यांचा ठाम विश्वास होता. मात्र, १६ ऑगस्टच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. त्यांना जनावरांच्या दोरीने बांधून नेले जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यावरून जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

येत्या १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी अवामी लीगवर बंदी घालण्यात आली असून त्यांच्या नेत्यांना निवडणुकीत सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अशातच एका हिंदू नेत्याचा कोठडीत मृत्यू झाल्याने बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अटकेनंतर आतापर्यंत अवामी लीगच्या पाच मोठ्या नेत्यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे, ज्यामुळे संशयाची सुई प्रशासनाकडे वळली आहे.

कोण होते रमेश चंद्र सेन?

रमेश चंद्र सेन हे ठाकुरगांव-१ मतदार संघातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले होते. बांगलादेशातील हिंदू समुदायाचे ते एक प्रभावी आणि आदरणीय नेते होते. त्यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे दिग्गज नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांच्याविरुद्ध आपला राजकीय बालेकिल्ला मजबूत ठेवला होता. रमेश चंद्र सेन यांच्या मृत्यूने बांगलादेशातील लोकशाही आणि मानवाधिकारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा जागतिक पातळीवरून टीका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh: Hindu Leader, Ex-Minister Ramesh Chandra Sen Dies in Custody

Web Summary : Amidst Bangladesh's election turmoil, Hindu leader Ramesh Chandra Sen died in custody, raising concerns about minority safety and custodial treatment. Allegations of negligence and political motives surround his death. He was a former minister and respected community figure.
टॅग्स :Bangladeshबांगलादेश