शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हाफिजच्या संघटनांवरील बंदी उठली; वटहुकमाची मुदत संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 03:59 IST

मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या संघटना जमाद-उद-दावा (जेयूडी) आणि फलह-ए-इन्सानियत फाउंडेशन (एफआयएफ) यांच्यावर आता पाकिस्तानात बंदी राहिलेली नाही. बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीतून त्या बाहेर पडल्या आहेत.

इस्लामाबाद : मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या संघटना जमाद-उद-दावा (जेयूडी) आणि फलह-ए-इन्सानियत फाउंडेशन (एफआयएफ) यांच्यावर आता पाकिस्तानात बंदी राहिलेली नाही. बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीतून त्या बाहेर पडल्या आहेत.या संघटनांवर संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावानुसार बंदी घालणारा वटहुकूम यापूर्वी राष्ट्रपतींनी काढला होता. मात्र तो संसदेत मंजुरीसाठी आला नाही आणि नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्या वटहुकुमाकडे मुद्दाम दुर्लक्ष करून मुदतवाढही देण्याचे टाळले. त्यामुळे तो वटहुकूम मुदत संपल्याने निष्प्रभ ठरला. यावर्षी फेब्रुवारीमध्ये माजी राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी जमात-उद-दावा आणि एफआयएफवर बंदी घालण्यासाठी दहशतवादविरोधी कायद्यात वटहुकुमाद्वारे दुरुस्ती केली होती.हाफिज सईदच्या एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी हा वटहुकूम निष्प्रभ झाल्याचे त्याच्या वकिलांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याला मुदतवाढही देण्यात आलेली नाही.याचिकेत सईदने म्हटले होते की, आपण २००२ मध्ये जमात-उद-दावाची स्थापना केली होती. प्रतिबंधित संघटना लश्कर-ए-तय्यबाशी सर्व संबंध तोडण्यात आले आहेत. पण, या संघटनेशी आपले पूर्वी संबंध असल्याने जमात-उद-दावावर भारत सातत्याने टीका करत आहे.(वृत्तसंस्था)>अन्य अतिरेकी संघटनांनाही फायदानोव्हेंबर २००८ मधील मुंबई हल्ल्यातील कट रचणाऱ्यांना शिक्षा व्हावी, असा दबाव भारतातर्फे पाकिस्तानवर सातत्याने आणला जात आहे. सईद हा लश्कर- ए-तय्यबाचा सह संस्थापक आहे. तो या हल्ल्यांसाठी जबाबदार आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये १६६ जणांचा मृत्यू झाला होता. आता वटहुकुमद्वारे ज्या संघटनांवर पाकिस्तानात बंदी होती, त्या सर्वांना या निर्णयाचा फायदा मिळेल.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईद