जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. काल रात्री भारताने पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता पाकिस्तानी लष्कर अलर्टवर आहे. दरम्यान, आता पाकिस्तानी सैन्यावर बलुच बंडखोरांनी हल्ला केला आहे. यामुळे आता पाकिस्तानमधील अंतर्गत वाद आता वाढल्याचे समोर आले आहे. बलुच बंडखोरांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला आहे. गेल्या २४ तासांत बलुचांनी पाकिस्तानी सैन्यावर केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात ७ सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
हा हल्ला बोलानमधील माचकुंड येथे करण्यात आला. बलुच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने पाकिस्तानी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला केला. रिमोट वापरून पाकिस्तानी सैन्याचे वाहन उडवून देण्यात आले.
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
पाकिस्तानी सैन्य लष्करी कारवाईची तयारी करत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ७ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याआधीही बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला होता, यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. बीएलएने त्यांच्या निवेदनांमध्ये सातत्याने पाकिस्तानी सैन्याचा उल्लेख भाडोत्री सैन्य असा केला आहे.
याआधीही बीएलएने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला होता, यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. हा हल्ला केच जिल्ह्यातील किलाग भागात झाला, तिथे पाकिस्तानी सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यात आले.