शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बलूच आंदोलक करणार यूएन मुख्यालयाबाहेर निषेध

By admin | Updated: September 8, 2016 19:44 IST

फ्री बलुचिस्तान मूव्हमेंटतर्फे संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयाबाहेर १३ सप्टेंबर रोजी ७३ व्या आमसभेच्या वेळेस निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 8 - बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाविरोधात फ्री बलुचिस्तान मूव्हमेंटतर्फे संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयाबाहेर १३ सप्टेंबर रोजी ७३ व्या आमसभेच्या वेळेस निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान करत असलेल्या अन्यायामुळे, हत्या आणि बॉम्बफेकीमुळे तेथे लोकांना जगणे मुश्कील झाल्याचे मच फ्री बलुचिस्तानने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.पाकिस्तानने आजवर अवलंबलेल्या किल अँड डंप पॉलिसीमधून ५००० बलूची लोकांना ठार मारले असून आजही २०,००० बलूची लोक पाकिस्तानच्या छळाला सामोरे जात आहेत. आज बलुचिस्तान ज्या क्रौर्याचा सामना करत आहे, त्याचप्रकारच्या क्रौर्याला कोसोवो, पूर्व तिमोर, दक्षिण सुदान सामना करत असताना संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने हस्तक्षेप केला होता. संयुक्त राष्ट्राची निर्मिती दुसऱ्या महायुद्धानंतर लहान देशांच्या स्वातंत्र्याविरोधात होणाऱ्या अन्याय व अधिकाराच्या उल्लंघनास विरोध करण्यासाठी झाली होती. पाकिस्तानने १९४७ साली संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व स्वीकारले आणि मानवाधिकार उल्लंघन व इतर राष्ट्रांशी कुरापती न करण्याच्या सनदेवर स्वाक्षरी केली होती. मात्र त्यानंतर काहीच महिन्यांमध्ये म्हणजे मार्च १९४८ मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानवर आक्रमण केले. हे आक्रमण आणि बलुचिस्तानात होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाविरोधात संयुक्त राष्ट्राने कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे सर्व देशांचे प्रतिनिधी आमसभेस आले असता हे आंदोलन करण्याचे फ्री बलुचिस्तान मूव्हमेंटने ठरवल्याचे त्यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.बलुची नेत्यांची भारताकडून अपेक्षाभारताने बलुचिस्तानात होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाबाबत आवाज उठवावा, यासाठी बलुची नेत्यांनी आणि आंदोलकांनी भारताला नेहमीच विनंती केली आहे. त्याचप्रमाणे युरोपात आम्हाला आश्रय मिळतो तसा भारताने आम्हाला आश्रय दिला तर आम्हाला आनंदच होईल असे मत बलोच रिपब्लीकन पार्टीचे अध्यक्ष ब्रहुमदाग बुग्ती यांनी व्यक्त केले होते. मागील आठवड्यात बुग्ती यांनी गणेश चतुर्थी निमित्त भारतीयांना ट्विटरवरून शुभेच्छाही दिल्या होत्या.