काठमांडू : रॅपर ते राजकीय नेता असा प्रवास असलेले बालेंद्र ऊर्फ बालेन शाह यांच्या 'राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी'ने नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड बहुमतासह ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राजकीयदृष्ट्या अस्थिर ठरलेल्या या देशात पारंपरिक राजकीय पक्षांची स्थिती या निवडणुकीत दयनीय झाली आहे.
नेपाळच्या निवडणूक आयोगानुसार, रवी लामिछाने यांनी २०२२ मध्ये स्थापन केलेल्या 'राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी'ने प्रत्यक्ष मतदानाद्वारे १६५ पैकी ११७ जागांवर आधीच विजय मिळवला आहे. आणखी आठ जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. नेपाळी काँग्रेस १७ जागा जिंकून दुसऱ्या स्थानी आहे. स्वतः लामिछाने चितवनमधून मोठ्या मतफरकाने विजयी झाले आहेत. माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाला केवळ ७ जागा मिळाल्या.
विजयाचे महत्त्व का ?
नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या १८ वर्षांत १४ सरकारे स्थापन झाली आणि गेली. 'आरएसपी'च्या रूपाने उदयास आलेले ३५ वर्षीय बालेन यांचे नेतृत्व देशाने उत्स्फूर्तपणे स्वीकारले.
नेपाळच्या सर्वोच्चपदी विराजमान होणारे बालेन शाह हे पहिले तरुण पंतप्रधान.
गेल्या काही वर्षांत नेपाळने चीनशी वाढवलेल्या संबंधांमुळे भारताच्या संबंधांत तणाव होता. बालेन संबंध पुनर्स्थापित करतील, अशी आशा.
भारत नेपाळसाठी सर्वात मोठा निर्यातदार असून दरवर्षी नेपाळच्या एकूण आयातीपैकी ६३ टक्के आयात भारतातून होते.
Web Summary : Balen Shah's 'National Independent Party' secured a historic victory in Nepal's election, shaking up traditional politics. The party, founded by Ravi Lamichhane, won significantly. Balen's rise offers hope for political stability and improved relations with India, a key trade partner.
Web Summary : बालेन शाह की 'राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी' ने नेपाल चुनाव में ऐतिहासिक जीत हासिल की, जिससे पारंपरिक राजनीति हिल गई। रवि लामिछाने द्वारा स्थापित पार्टी ने महत्वपूर्ण जीत हासिल की। बालेन का उदय राजनीतिक स्थिरता और भारत के साथ बेहतर संबंधों की उम्मीद जगाता है।