शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:47 IST

ओली यांच्या कारकि‍र्दीत भारत आणि नेपाळ संबंध बिघडले होते. त्यातून ओली यांना चीनचा माणूस अशी प्रतिमा तयार झाली. 

काठमांडू - नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झालं असून बालेन शाह पंतप्रधान बनले आहेत. नेपाळ सरकारचे नवे पंतप्रधान सर्वात आधी भारताचा दौरा करतात ही जुनी परंपरा आहे. बालेन शाहदेखील ही परंपरा कायम ठेवणार आहेत. परंतु ते जुन्या पंतप्रधानांप्रमाणे भारतीय पंतप्रधानांची केवळ औपचारिक भेट घेणार नाहीत तर त्यांनी भारतासमोर काही अटी ठेवल्या आहेत. 

नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी याची पुष्टी करत म्हटलंय की, भारत आणि नेपाळचे अधिकारी अशा मुद्द्यांवर काम करत आहेत ते अंतिम झाल्यानंतर बालेन शाह दिल्ली दौरा करतील. पंतप्रधान बालेन शाह यांना भारतीय पंतप्रधानांकडून भारतात येण्याचं आमंत्रण मिळाले आहे आणि त्यांनी ते स्वीकारले आहे. परंतु बालेन शाह पंतप्रधान मोदींना केवळ भेटणार नाहीत तर या भेटीतून काही फलित निघेल असा संवाद त्यांना साधायचा आहे. केपी शर्मा ओली यांच्या कार्यकाळात नेपाळ आणि भारताचे संबंध खूप बिघडले होते. परंतु आता नेपाळमधील नवे सरकार भारतासोबत संबंध पुन्हा रुळावर आणण्याच्या तयारीत आहे.

ओली यांच्या कारकि‍र्दीत भारत आणि नेपाळ संबंध बिघडले होते. त्यातून ओली यांना चीनचा माणूस अशी प्रतिमा तयार झाली.  ओली यांच्या आडकाठी भूमिकांमुळे हे संबंध ताणले गेले होते. आता पंतप्रधान बालेन शाह भारतासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दौरा करत आहेत, जेणेकरून या भेटीतून काहीतरी साध्य होईल. भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध सुधारण्याबाबत अनेक मुद्द्यांवर ते मोदींसोबत चर्चा साधतील असं नेपाळी परराष्ट्र मंत्र्‍यांनी सांगितले.

नेपाळसोबत संबंध का बिघडले?

ओली यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात नेपाळमध्ये संविधानात दुरुस्ती करून नवीन नकाशा प्रसिद्ध केला होता. ज्यात कालापानी, लिम्पियाधुरा आणि लिपुलेख या भारतीय भागांचा समावेश नेपाळमध्ये केला होता. ओली यांनी नेपाळी लोकांना भारतीयांविरोधात भडकावले होते. भारताच्या राष्ट्रीय प्रतिकाचा अपमान ओली यांनी केला होता. प्रभू रामांचा जन्म भारतात नाही तर नेपाळमध्ये झाल्याचा दावाही त्यांनी केला. परंतु ओली आता इतिहासजमा झालेत. नेपाळच्या राजकारणात नवे लोक आलेत. त्यांना भारतासोबत संबंध कसे ठेवायचे आहेत हे ठरवायचे आहे. 

बालेन शाह यांच्या नेतृत्वात नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचं सरकार बनले आहे. भारतासोबत त्यांना संबंध सुधारण्याची इच्छा आहे. ते भारताकडे एक अतिरिक्त हवाई मार्गाची मागणी करू शकतात. जेणेकरून नेपाळ जगातील इतर भागाशी सहज हवाई संपर्क ठेवेल. लिपुलेखच्या मार्गाने होणाऱ्या व्यापारावरही चर्चा होईल. त्यामुळे बालेन शाह यांच्या दौऱ्यात नेपाळला काय मिळते हे पाहणे गरजेचे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Balen Shah sets conditions for Modi meet; Nepal-India ties to improve?

Web Summary : Nepal's PM Balen Shah will visit India, but seeks productive dialogue with Modi. He aims to mend strained relations from the Oli era, focusing on trade and air routes. Discussions will address past issues and future cooperation.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळIndiaभारत