शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 11:28 IST

Brahmos Deal with Vietnam : चीनच्या या दादागिरीमुळे फिलीपिन्स, व्हिएतनाम, तैवान आणि मलेशियासारख्या देशांच्या सागरी भागावर कब्जा होण्याचा धोका वाढला आहे. अशा स्थितीत, भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र या देशांसाठी एक मजबूत सुरक्षा कवच सिद्ध होऊ शकते...

फिलीपिन्सनंतर आता व्हिएतनामही भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा आशिया खंडातील दुसरा देश बनणार आहे. ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कराराची (डीलची) एकूण किंमत सुमारे ७०० मिलिय डॉलर्स अर्थात अंदाजे ५९९० कोटी रुपये एवढी असू शकते. या करारावर लवकरच मोठा निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

फिलीपिन्सप्रमाणेच व्हिएतनामचाही दक्षिण चीन समुद्रातील सागरी सीमेवरून चीनसोबत वाद आहे. यामुळे व्हिएतनाम आपले सैन्य बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षांत भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील लष्करी संबंध अधिक दृढ झाले आहेत.

तत्पूर्वी, फिलीपिन्सने भारतासोबत ३७५ मिलियन डॉलर्समध्ये तीन ब्रह्मोस क्षेपणास्त्र बॅटरींसाठी डील केली होती. आता भारताने फिलीपिन्सला या क्षेपणास्त्रांचा पुरवठाही सुरू केला आहे. यानंतर आता, व्हिएतनामसोबतचा ब्राह्मोस क्षेपणास्त्र करारही अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याचे बोलले जाते. याच बरोबर, या क्षेपणास्त्रासंदर्भात इंडोनेशियाशीही चर्चा सुरू आहे. हा करार सुमारे ४५० मिलियन डॉलर्सचा असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय मध्य आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांनीही ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यात रस दाखवला आहे.

600 किलोमीटरपेक्षाही अधिक रेंज असणार -पूर्वी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारा क्षमता २९० किमी होती, मात्र आता ती, आणखी वाढवण्याची तयारी सुरू आहे. भारतीय शास्त्रज्ञ या क्षेपणास्त्राची मारक क्षमता अथवा रेंज ४०० ते ६०० किलोमीटरपर्यंत करण्यासाठी काम करत आहेत. नुकतेच, भारतीय हवाई दलाने सुखोई लढाऊ विमानातून ब्राह्मोस एक्सटेंडेड रेंजची यशस्वी चाचणी केली, याची स्ट्राइक रेंज ४०० किलोमीटरपेक्षाही अधिक होती.

चीनसाठी धोक्याची घंटा -दक्षिण चीन समुद्र आणि त्याच्या जवळपासच्या भागातील देशांना चीन सातत्याने धमकावत असतो. तो अनेक वेळा, या देशांच्या विशेष आर्थिक क्षेत्र (EEZ) अर्थात विशेष सागरी क्षेत्रातही हस्तक्षेप करतो. २००९ पासून चीन आणि फिलीपिन्समधील संबंधही अधिकच बिघडले आहेत. चीनने एक नवीन नकाशा जारी केला आहे. यात त्यांनी ९-डॅश लाइन बनवून दक्षिण चीन समुद्राचा एक मोठा भाग आपला असल्याचा दावा केला आहे. यात फिलीपिन्समधील अनेक बेटे आणि EEZ च्या काही भागाचा समावेश आहे. चीनच्या या दादागिरीमुळे फिलीपिन्स, व्हिएतनाम, तैवान आणि मलेशियासारख्या देशांच्या सागरी भागावर कब्जा होण्याचा धोका वाढला आहे. अशा स्थितीत, भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र या देशांसाठी एक मजबूत सुरक्षा कवच सिद्ध होऊ शकते. 

टॅग्स :VietnamविएतनामBrahmos Missileब्राह्मोसchinaचीन