शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘इसिस’मधील फितुरानेच दिला बगदादीचा ठावठिकाणा; गुप्तहेरांकडूनही होती माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 02:49 IST

मोलाच्या कामगिरीबद्दल अमेरिकेकडून इनामही मिळणार

बगदाद : गेल्या शनिवारी उत्तर इराकमध्ये अमेरिकेने केलेल्या ज्या लष्करी कारवाईत ‘इस्लामिक स्टेट’चा (इसिस) प्रमुख अबू बक्र अल बगदादी ठार झाला त्यात ‘इसिस’मधीलच एका फितूर नेत्याने फार महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे बगदादीसाठी अमेरिकेने जाहीर केलेले २५ दशलक्ष डॉलरचे इनामही त्यालाच दिले जाईल, असे वृत्त आहे.

अमेरिकेतील ‘सीएनएन’ वृत्तवाहिनी व ब्रिटनमधील ‘दि मेल’ वृत्तपत्राने अमेरिकी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले. मात्र ‘इसिस’च्या या फितूराचे नाव किंवा नेमका हुद्दा त्यात उघड केला गेला नाही. सूत्रांनी सांगितले की, बगदादीचा मुक्काम नेमका कुठे आहे याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्यापूर्वी अमेरिकेने बगदादीच्याच या विश्वासू सहकाऱ्यास फितूर करून घेतले व आपला हेर म्हणून कामाला लावले. बगदादी ज्या इमारतीत राहात होता तिची नेमकी रचना, तेथे जाण्या-येण्याचे मार्ग, लपून बसण्याच्या जागा, तेथे तैनात असलेले सशस्त्र पहारेकरी याची इत्यंभूत माहिती या फितूराने अमेरिकेच्या सैन्यास दिली. त्यामुळे नेमकी कारवाई करून ती फत्ते करणे शक्य झाले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानुसार वाचणे अशक्य आहे, याची खात्री झाल्यावर भयभीत झालेला बगदादी ओरडत, किंचाळत तळघरातील एका बोगद्यात शिरला. जाताना त्याने आपल्या तीन मुलांनाही सोबत ओढून नेले. पण त्या बोगद्याला दुसºया बाजूने बाहेर पडण्यासाठी तोंड नसल्याने बगदादीने अंगावर घातलेल्या स्फोटकांनी भरलेल्या जॅकेटचा स्फोट घडवून आत्मघात करून घेतला. त्या स्फोटाने बगदादीच्या देहाच्या ठिकºया उडाल्या. खातरजमा करून घेतलीबगदादीचा ओळख पटेल अशा स्थितीतील मृतदेह हाती लागला नाही. तरी अमेरिकी सैन्याने लगेच जागीच ‘डीएनए’ चाचणी करून मेला तो बगदादीच असल्याची पुरती खातरजमा करून घेतली, असेही ट्रम्प म्हणाले होते. या ‘डीएनए’ चाचणीसाठी बगदादीने वापरलेल्या दोन जुन्या अंडरवेयर व त्याच्या रक्ताचे नमुने सोबत घेऊनच अमेरिकी सैन्य जय्यत तयारनिशी आले होते. बगदादीच्या जुन्या अंडरवेयर व रक्ताचे नमुनेही ‘इसिस’मधील याच फितुराने कारवाईच्या काही दिवस आधी मिळवून अमेरिकी हेरांकडे सुपूर्द केले होते, असेही या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पISISइसिस