शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पर्यवेक्षकांकडून मिळते वाईट वागणूक, कॉग्निझंटविरुद्ध अमेरिकी कर्मचाऱ्यांची न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:07 IST

सर्वांत मोठी एच १-बी व्हिसा प्रायोजक कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पच्या काही अमेरिकी कर्मचाºयांनी कंपनीविरुद्ध कोर्टात धाव घेतली असून, भारतीय पर्यवेक्षकांकडून भेदभावकारक वागणूक मिळाल्याने आपल्या कामाचे योग्य मूल्यमापन होत नसून परिणामी आपल्याला कामावरून काढल्याचा आरोप केला आहे.

ब्लूमबर्ग : सर्वांत मोठी एच १-बी व्हिसा प्रायोजक कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पच्या काही अमेरिकी कर्मचाºयांनी कंपनीविरुद्ध कोर्टात धाव घेतली असून, भारतीय पर्यवेक्षकांकडून भेदभावकारक वागणूक मिळाल्याने आपल्या कामाचे योग्य मूल्यमापन होत नसून परिणामी आपल्याला कामावरून काढल्याचा आरोप केला आहे.भारतीय नसलेल्या कर्मचा-यांना कंपनीत वाईट वागणूक दिल्याचा आरोपही कर्मचा-यांनी याचिकेत केला आहे. कंपनीने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तीन माजी कर्मचा-यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, आपले पर्यवेक्षक (सुपरवायझर) व सहकारी भारतीय होते. त्यांनी आमची कामगिरी मुद्दाम कमी दर्जाची दाखवून आम्हाला पदोन्नती नाकारली, तसेच नंतर आम्हाला कामावरून काढून टाकले. कंपनीने म्हटले की, हे प्रकरण अमेरिकेच्या केंद्रीय नागरी हक्क कायद्यात बसत नाही. १९६४ च्या कायद्याने वांशिक भेदभावास बंदी आहे. याचिकाकर्त्या कर्मचाºयांनी केलेला भेदभावाचा आरोप देशाशी संबंधित आहे, वंशाशी नव्हे. तक्रारकर्त्यांनी व्हिसाधारकांना लक्ष्य केल्याचे दिसते.ही याचिका अमेरिकी राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणाचा परिपाक आहे, असे जाणकार सांगतात. हे दावे कोणत्याही सुनावणीविनाच फेटाळण्याची विनंती कॉग्निझंटने केली आहे.सर्वाधिक व्हिसागेल्या वर्षी कॉग्निझंटला सर्वाधिक २९ हजार एच १-बी व्हिसा मिळाले. दुसºया स्थानावरील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट व गुगल आयएनसी यांना मिळालेल्या व्हिसाची संख्या ५ हजारांपेक्षाही कमी आहे. टीसीएस व विप्रो यासह आणखी दोन आयटी कंपन्यांविरुद्धही अमेरिकेतील कर्मचाºयांनी विविध ठिकाणी असेच खटले भरले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या ठिकाणच्या प्रकरणात एकच विधि संस्था कर्मचाºयांच्या वतीने बाजू मांडत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाCourtन्यायालय