शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

बाबासाहेबांचे लंडनमधील स्मारक युवकांचे प्रेरणास्थान; विजय दर्डा, देशमुख, भन्साळी यांची आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:28 IST

लंडन : ‘मला आज परमपूज्य बाबासाहेबांच्या लंडनमधील निवासस्थानाचे दर्शन घेता आले, हे मी माझे सौभाग्य समजतो. बाबासाहेबांविना हा देश, हा समाज कसा असता? विचार करा!’ अशा भावना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी लंडनच्या १०, किंग्ज हेन्री रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला ...

लंडन : ‘मला आज परमपूज्य बाबासाहेबांच्या लंडनमधील निवासस्थानाचे दर्शन घेता आले, हे मी माझे सौभाग्य समजतो. बाबासाहेबांविना हा देश, हा समाज कसा असता? विचार करा!’ अशा भावना लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी लंडनच्या १०, किंग्ज हेन्री रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट दिल्यानंतर तेथील अभ्यागत पुस्तिकेत व्यक्त केल्या.‘बाबासाहेब भारतात जन्मले, हे या देशाचे भाग्य आहे. १२० कोटी जनतेचा सच्चा प्रतिनिधी असल्याचा धर्म पाळल्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. हे स्मारक अनंत-अनंत युवकांचे प्रेरणास्थान बनेल. महान राष्टÑनिर्मितीच्या दिशेने उचललेले ते एक पाऊल ठरेल,’ असे विजय दर्डा यांनी या अभिप्राय पुस्तिकेत नमूद केले.या भेटीदरम्यान माजी मंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख आणि मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष किरीट भन्साळी हेही विजय दर्डा यांच्यासोबत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२१-२२ मध्ये याच निवासस्थानी राहून ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’मधून उच्च शिक्षण घेतले होते, हे येथे उल्लेखनीय आहे. ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६) सामाजिक न्यायाचा योद्धा, येथे १९२१-२२ या काळात वास्तव्याला होते,’ असा मजकूर या स्मारकाच्या बाहेर एका निळ्या पाटीवर लिहिलेला आहे.या स्मारकात बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित त्यांच्या वापरातील अनेक वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. त्यात ‘जनता’(द पीपल) या पाक्षिकाच्या अंकाचा समावेश आहे. डॉ. आंबेडकरांनी १९३० मध्ये त्याचे प्रकाशन केले होते. बाबासाहेबांनी पाक्षिकाच्या रूपात सुरू केलेली ही तिसरी पत्रिका कालांतराने साप्ताहिक बनली होती. बाबासाहेब ‘जनता’चे पहिले संपादक होते. या संग्रहालयात १८ फेब्रुवारी १९३३ चे एक ऐतिहासिक पत्रही ठेवले आहे. हे पत्र बाबासाहेबांनी महात्मा गांधी यांना लिहिले होते. या पत्रात बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचा संवेदनशील मुद्दा उपस्थित केला आहे. याशिवाय स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या छायाचित्रासह भारतीय इतिहासातील अनेक आठवणी जतन करून ठेवलेल्या आहेत.

टॅग्स :Londonलंडन