शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयुष मंत्रालयाने सुचित केल्यानुसार पन्नासपुढील नागरिकांना आता आयुर्वेद, होमिओपॅथी औषधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 17:50 IST

शिंदे म्हणाले की, जिल्हयात कोरोनाचे संकट थोपवून धरण्यात सर्व यंत्रणाबरोबरच जिल्हयातील जनतेचे फार मोठे योगदान आहे. यापुढेही कोरोना विषाणू रोखण्यासाठी शहर तसेच गावागावात खंबीर आणि कठोर भुमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

ठळक मुद्देगावनिहाय माहिती तात्काळ तयार करण्याचे निर्देशजिल्हयाच्या ग्रामीण भागातील जवळपास 11 लाखाहून अधिक लोकांना आयुष चिकीत्सा प्रणालींतर्गत आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरविण्यात येणार आहेत.

कोल्हापूर :- जिल्हयातील 50 किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांना प्रतिबंधात्मक व रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरविण्यात येणार असून यासाठीची गावनिहाय माहिती तात्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मकउपाययोनांचा आढावा आणि नियोजनासाठी आज समन्वयक संजय शिंदे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी वेबेक्स व्हीसीव्दारे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि तहसिलदारांशी संपर्क साधून आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 50 किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. 

आयुष मंत्रालयाने सुचित केल्यानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीप्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोजना करणे व रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे यासाठी जिल्ह्यातील 50 व  त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी 50 व त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांची गावनिहाय माहिती तयार करुन त्यानुसार औषधे दिली जाणार आहेत.

यासाठी गाव तसेच तालुकानिहाय नियोजन करणे गरजेचे आहे. अशी माहिती संकलित करण्यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांचा आधार घेण्यात येणार आहे. यासाठी महाआयुष ॲप तयार केले असून त्यामध्ये ही माहिती भरण्यात येणार आहे. हे काम युध्दपातळीवर करायचे असल्याने सर्व गटविकास अधिकारी आणि आरोग्य विभागातील कर्मचारी विशेषत: आशा वर्कस यांनी सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.

जिल्हयाच्या ग्रामीण भागातील जवळपास 11 लाखाहून अधिक लोकांना आयुषचिकीत्सा प्रणालींतर्गत आयुर्वेद तसेच होमिओपॅथी औषधे पुरविण्यात येणार आहेत. यासाठीचा खर्च जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर जिल्हयाबाहेरुन तसेच अन्य राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठी असणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आदेशांचे महानगरपालीका, नगरपालीका- नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीनेकाटेकोरपणे पालन करण्याची सूचना करुन  शिंदे म्हणाले की, जिल्हयात कोरोनाचे संकट थोपवून धरण्यात सर्व यंत्रणाबरोबरच जिल्हयातील जनतेचे फार मोठे योगदान आहे. यापुढेही कोरोना विषाणू रोखण्यासाठी शहर तसेच गावागावात खंबीर आणि कठोर भुमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :medicineऔषधंdocterडॉक्टरgovernment schemeसरकारी योजना