शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर तळावरील दुर्घटनेत 200 जणांचा बळी, किरणोत्सर्गाचा धोका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 20:45 IST

उत्तर कोरियाच्या न्यूक्लियर तळावर झालेल्या दुर्घटनेमध्ये 200 जणांचा बळी गेला आहे.  उत्तर कोरियाच्या ईशान्य भागातीलन्यूक्लियर तळावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात पडझड होऊन हा अपघात झाला.

प्योंगयोंग - उत्तर कोरियाच्या न्यूक्लियर तळावर झालेल्या दुर्घटनेमध्ये 200 जणांचा बळी गेला आहे.  उत्तर कोरियाच्या ईशान्य भागातील न्यूक्लियर तळावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात पडझड होऊन हा अपघात झाला. 10 ऑक्टोबरला झालेल्या या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चेर्नोबिल आणि फुकुशिमा येथील दुर्घटनांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिगत बोगद्याच्या बांधकामादरम्यान ही पडझड झाली. यामध्ये 100 लोक गाडले गेले. तर मदतकार्य सुरु असताना पुन्हा एकदा मोठा भाग कोसळला. यात अजून 100 लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, अणुचाचणीदरम्यान बसणाऱ्या हादऱ्यांमुळेच हा बोगदा कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 3 सप्टेंबरला उत्तर कोरियाने मोठी अणुचाचणी केली होती. त्यावेळी डोंगरदऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्स्खलनाच्या घटना घडल्या होत्या. तसेच या अणुचाचणीमुळे भूकंपाचे धक्केही जाणवले होते. या अपघाताचे वृत्त जपानी वृत्तसंस्थांनी दिले आहे. उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर प्रोग्राम आणि अणुबॉम्ब चाचणीमुळे आधीच  कोरियन द्विपकल्पात तणाव आहे. दुसरीकडे अमेरिकेकडूनही वारंवार आक्रमक भूमिका घेतली जात असून, धमक्या दिल्या जात आहेत. उत्तर कोरिया अमेरिकेसहित संपुर्ण जगाला अणुबॉम्बची भीती दाखवत आहे. एका रिपोर्टनुसार, जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल.  अमेरिकी काँग्रेसच्या थिंक टँक काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या रिपोर्टच्या हवाल्याने ब्लूमबर्गने होणा-या नुकसानाचा अंदाज लावला आहे. 62 पानांचा हा रिपोर्ट अमेरिकी खासदारांना पाठवण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, जर युद्ध झालं तर, कोरियन द्विपकल्पातील जवळपास अडीच कोटी लोक प्रभावित होतील. यामधील एक लाखांहून जास्त अमेरिकन नागरिकांचा समावेश असेल.  रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने आपल्या पारंपारिक शस्त्रांचा वापर केल्यास पहिल्याच दिवशी 30 हजार ते तीन लाख लोक मारले जातील. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, उत्तर कोरियाजवळ 10 हजार राऊंट प्रती सेकंद वेगाने फायरिंग करण्याची क्षमता आहे. तसंच एकदा युद्धाची घोषणा झाल्यास यामध्ये चीन, जपान आणि रशियाही उतरु शकतं असा अंदाज रिपोर्टमधून वर्तवण्यात आला आहे.  अमेरिकेसाठी युद्ध खूपच नुकसान देणारं ठरु शकतं. रिपोर्टनुसार, युद्धासाठी मोठ्या संख्येने अमेरिकन सैनिक कोरियन द्विपकल्पात एकत्र येतील. अशा परिस्थिती मोठं लष्करी नुकसान होण्याची शक्यता आहे. शक्यता वर्तवण्यात येत आहे की, चीनदेखील युद्धात उडी घेऊ शकतं. युद्धाच्या छळा कोरियन द्विपकल्पाबाहेर जातील, ज्यामुळे होणारं नुकसान खूप मोठं असेल.