Bangladesh Politics Sheikh Hasina: बांगलादेशात नवे सरकार प्रस्थापित झाले. या निवडणुकीनंतर लगेचच शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने बांगलादेशमध्ये कामकाज पुन्हा सुरू केले. अवामी लीगच्या नेत्यांनी खुलनामध्ये आपले कार्यालय पुन्हा उघडले आणि नेत्यांनी कार्यालयाला भेट देण्यासही सुरुवात केली. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या सरकार विरोधक व्यापक आणि हिंसक जनआंदोलन झाल्यानंतर, शेख हसीना यांचा पक्ष फारसा चर्चेत दिसला नव्हता. बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या कार्यालयांवर बंदी घालण्यात आली होती. पक्षाला आगामी निवडणुकीत भाग घेण्याची परवानगीही नाकारण्यात आली होती. पण आता नवे सरकार आल्यामुळे पुन्हा लोकशाहीचे राज्य आले असून, अवामी लीग पक्षाच्या बांगलादेशातील हालचाली वाढल्याचे चित्र आहे. याचाच दुसरा अर्थ असाही लावला जात आहे की, शेख हसीना हळूहळू बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे.
द बिझनेस स्टँडर्डनुसार, अवामी लीगने खुलनामध्ये आपले पक्ष कार्यालय पुन्हा सुरू केले आहे. जुलैत झालेल्या आंदोलना दरम्यान हे कार्यालय जाळून टाकण्यात आले होते. खुलनाला एकेकाळी अवामी लीगचा बालेकिल्ला मानले जात होते. पण तेथेच हा हल्ला झाल्याने हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. खुलना सदर अलाहाबादचे संघटन सचिव फैजुल हक रुबेल यांच्या मते, बांगलादेशमध्ये अवामी लीगचे उपक्रम पुन्हा सुरू झाले आहेत. "आम्ही आमचे कार्यालय पुन्हा सुरू केले आहे. लोक येथे येतील आणि त्यांच्या समस्या मांडतील. कार्यक्रम देखील होतील. आता कुठलीही बंदी किंवा कोणतीही समस्या नाही," असे ते म्हणाले. दरम्यान, पक्षाच्या कार्यांवरील बंदी अधिकृतपणे उठवण्यात आलेली नाही.
शेख हसीना परतणार?
द गार्डियनने या महिन्याच्या सुरुवातीला अवामी लीगबद्दल वृत्त दिले होते. त्यात म्हटले होते की अवामी लीगचे वरिष्ठ नेते बांगलादेशात परतण्याची तयारी करत आहेत. हे नेते तळागाळापर्यंत अवामी लीगला बळकटी देण्यासाठी संधी शोधत होते. शेख हसीना सध्या नवी दिल्लीत राहत असल्याची माहिती आहे. शेख हसीना आता बांगलादेशात परतू शकतील की नाही यावर पक्षाने अद्याप भाष्य केलेले नाही. पण बांगलादेशात शेख हसीना यांवर १०० हून अधिक खटले आहेत आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.
Web Summary : Following Bangladesh's new government, Awami League resumed activities, reopening offices. Despite past restrictions and Sheikh Hasina's legal challenges, speculation arises about her potential return to Bangladeshi politics. Senior leaders are preparing to strengthen the party at the grassroots level.
Web Summary : बांग्लादेश में नई सरकार के बाद, अवामी लीग ने गतिविधियाँ फिर से शुरू कीं, कार्यालयों को फिर से खोला गया। पिछली पाबंदियों और शेख हसीना की कानूनी चुनौतियों के बावजूद, उनकी बांग्लादेशी राजनीति में संभावित वापसी के बारे में अटकलें लगाई जा रही हैं। वरिष्ठ नेता जमीनी स्तर पर पार्टी को मजबूत करने की तैयारी कर रहे हैं।