शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

KLF चा प्रमुख अवतार खांडाचा मृत्यू, भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्याचा होता सूत्रधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 11:19 IST

मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, मेडिकल  रिपोर्ट अजून आला नाही. 

खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) या दहशतवादी संघटनेचा स्वयंघोषित प्रमुख अवतार सिंग खांडा याचे आज बर्मिंगहॅम येथील सँडवेल रुग्णालयात निधन झाले. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात 19 मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराचा तो मुख्य सूत्रधार होता. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, मेडिकल  रिपोर्ट अजून आला नाही. 

खांडा याला रणजोध सिंह या नावानेही ओळखले जाते. त्याला ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय हवा होता. कथित खलिस्तानच्या फुटीरतावादी चळवळीकडे शीख तरुणांना कट्टरतावादी बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याचे वडील कुलवंत सिंह खुखराना हे KLF दहशतवादी होते, वडिलांना 1991 मध्ये सुरक्षा दलांनी ठार केले होते. 

ब्रिटनमधून मिळालेल्या माहितीनुसार, खांडाच्या समर्थकांना मेडिकल रिपोर्टमध्ये विषबाधा झाल्याचे सूचित करायचे आहे, जेणेकरून ते त्याला शहीद घोषित करू शकतील आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांवर हत्येचा आरोप करू शकतील. मात्र, खांदा ब्लड कॅन्सरने त्रस्त होता आणि त्याला सँडवेल आणि वेस्ट बर्मिंगहॅम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

राष्ट्रीय तपास संस्थेने 19 मार्च रोजी नियोजित आंदोलनादरम्यान लंडन उच्चायुक्तालयात भारतीय ध्वजाची विटंबना करणारा मुख्य आरोपी म्हणून खांदा याची ओळख पटवली आहे. दरम्यान, इतर खलिस्तानी सहानुभूतीदारांप्रमाणे खांदा हा विद्यार्थी व्हिसाद्वारे ब्रिटनमध्ये दाखल झाला आणि लगेच ब्रिटनमधील काही प्रमुख गुरुद्वारांमध्ये कार्यरत असलेल्या फुटीरतावादी दलामध्ये सामील झाला. या गुरुद्वारांचे व्यवस्थापन खलिस्तानी समर्थकांद्वारे केले जाते. 

टॅग्स :Londonलंडन